हाजी मलंग दर्गा की मंदिर?, राजकारण का तापले? नेमका त्याचा इतिहास काय?
हाजी मलंग दर्गा की मंदिर हा वाद आताच का उफाळून आला आणि एकनाथ शिंदे याच वेळी असं का बोलले असे एक ना अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत. त्यांच्या त्या वक्तव्यामुळेच आता हाजी मलंग दर्गा आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
ADVERTISEMENT
दीपेश त्रिपाठी/ ठाणे : कित्येक वर्षांपासून जुना असलेला हाजी मलंग दर्ग्याला ‘मी मुक्त केल्याशिवाय शांत बसणार नसल्याचे’ वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी 2 जानेवारी केले. त्यानंतर राजकीय वर्तुळात प्रचंड मोठी खळबळ उडाली. त्यांच्या त्या वक्तव्यानंतर हाजी मलंग दर्ग्याचा इतिहासच अनेकांनी मांडला. मात्र हाजी मलंग दर्गा हे मंदिर असल्याचा एका गटाचा दावा आहे. या दर्ग्याविषयी माहिती सांगताना सांगितले जाते की, हा दर्गा समुद्र सपाटीपासून 3 हजार फुटाच्या उंचीवर आहे. 12 व्या शतकातील सूफी संत हाजी अब्द-उल-रहमान यांचा हा दर्गा असल्याचेही येथील स्थानिक लोकं सांगतात. मात्र त्यांना हाजी मलंग बाबा नावानेही ओळखले जाते. आता पुढील महिन्यात म्हणजेच फेब्रुवारी महिन्याच्या 20 तारखेला हाजी मलंग यांच्या जयंतीचीही आता जोरदार तयारी केली जात आहे.
ADVERTISEMENT
दर्गा नाही मंदिर आहे
कल्याणमध्ये असलेल्या सुफी संतांच्या त्या दर्ग्यावर जाण्यासाठी दोन तासांचा वळणावळणांच्या रस्त्याने चढ चढावी लागते. दर्ग्याचे ट्रस्टीमधील चंद्रहास केतकर यांनी याबद्दल सांगताना म्हणाले की, ‘जो कोणी हाजी मलंग दर्गा हा मंदिर असल्याचा दावा करत आहे, ते फक्त राजकीय फायद्यासाठी ते सांगत असतात’. चंद्रहास केतकर यांचे कुटुंब गेल्या 14 पिढीपासून या दर्ग्याची देखभाल करतात. 1980 च्या दशकामध्ये स्थानिक नेते आनंद दिघे यांनी हे ठिकाणी नाथ पंथातील प्राचीन मंदिर असल्याचे सांगत त्यांनी दर्ग्याला विरोध करायला सुरुवात केली होती.
‘मी शांत बसणार नाही’
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मलंगगड हरिनाम सप्ताहमध्ये बोलताना त्यांनी सांगितले की, ‘मलंगगडाविषयी असलेली येथील प्रत्येक नागरिकाची भावना मला माहिती आहे. आनंद दिघे यांनीच मलंगगड मुक्ती आंदोलन सुरु केले होते. त्यावेळेपासूनच जय मलंग, श्री मलंगचा जप सुरु करण्यात आला होता. मात्र काही गोष्टी अशा असतात की, त्या सार्वजनिक ठिकाणी बोलल्या जात नाहीत. त्याची सार्वजनिकरित्या चर्चा होत नाहीत. त्यामुळे जशी तुमची इच्छा आहे, ती इच्छा मी पूर्ण केल्याशिवाय आता शांत बसणार नाही’ असंही त्यांनी सांगितले.
हे वाचलं का?
हे ही वाचा >> Jitendra Awhad : पवारांच्या दोन नेत्यांमध्ये ठिणगी; आव्हाडांचं रोहित पवारांना खरमरीत उत्तर
संमिश्र वास्तू
मलंग दर्ग्याबद्दल बोलताना चंद्रहास केतकर सांगतात की, हाजी मलंगच्या ट्रस्टीसंबंधित केतकर कुटुंबाच्या एका प्रकारणात सर्वोच्च न्यायालयाने टिप्पणी केली होती की, ‘दर्गा ही संमिश्र वास्तू असून ती हिंदू किंवा मुस्लिम त्यावर नियंत्रित करू शकत नसल्याचे त्यावेळी कायद्याद्वारे स्पष्ट करण्यात आले होते’. त्यावेळी न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आले होते की, ‘ट्रस्टकडून ज्या प्रकारे खास रितिरिवाज आणि त्यांच्या नियमांनुसारच केले जाईल हे स्पष्ट केले होते’.
मलंग दर्गा राजकीय मुद्दा
यावेळी चंद्रहास केतकर यांनी पुन्हा राजकीय मुद्यावर बोलत, ‘मतदारांसाठी आणि त्यांना भुलवण्यासाठी हाजी मलंग दर्ग्याचा राजकीय मुद्या केला जात असल्याची गंभीर टीकाही त्यांनी केली आहे’. मात्र या गोष्टीचे राजकारण करण्यात आले तरी दरवर्षी हजारो भाविक येथे मन्नत घेऊन दर्ग्यावर येतात असंही त्यांनी सांगितले.
ADVERTISEMENT
ऐतिहासिक नोंदी
या हाजी मलंग दर्ग्याचा उल्लेख वेगवेगळ्या ऐतिहासिक नोंदीमध्ये आढळतो. 1982 मध्ये प्रकाशित झालेल्या बॉम्बे प्रेसिडेन्सीच्या गॅझेटियर्समध्येही आहे. त्यामध्ये असं सांगितले आहे की, हा दर्गा अरब धर्मप्रचारक हाजी अब्दुल-उल-रहमानच्या सन्मानासाठी बांधला गेला होता. तोच हाजी मलंग म्हणून प्रसिद्ध होता. तर असंही सांगितले जाते की, नळ राजाच्या कारकिर्दीत सुफी संत आपल्या अनेक अनुयायांसह येमेनहून आले आणि माथेरानच्या डोंगराच्या पायथ्याशी स्थायिक झाले होते. मलंग दर्ग्याबाबत अनेक ऐतिहासिक संदर्भ मिळत असले तरी काही आख्यायिकांमधून असंही सांगितले जाते नल राजाने आपल्या मुलीचे लग्न एका सूफी संताशी केले होते. त्याचबरोबर बाबा हाजी मलंग आणि माँ फातिमा या दोघांच्या कबरीही या दर्ग्याच्या संकुलात आहेत.
ADVERTISEMENT
राजकीय मुद्दा
मलंग दर्ग्याविषयी सांगितले जाताना बॉम्बे प्रेसिडेन्सीच्या गॅझेटियर्सचाही संदर्भ दिला जातो. त्यामध्ये असंही म्हटले आहे की 12 व्या शतकापासून तिथे कबर आहे. तर राजपत्रात असंही सांगण्यात आले आहे की, 18 व्या शतकात तत्कालीन मराठा महासंघाने कल्याण येथील काशिनाथ पंत खेतकर या ब्राह्मणाच्या नेतृत्वाखाली दर्गत यांना अर्पण पाठवले होते. कारण स्थानिक लोकांचा असा विश्वास होता की बाबा हाजी मलंग यांच्या अधिकारामुळे इंग्रजांना येथून माघार घ्यावी लागली होती, आणि ते परत गेले होते. त्यामुळे जुन्या गॅझेटियर्सचा संदर्भ देत चंद्रहास केतकरांनी मात्र मलंग दर्गा आता राजकारणाचा मुद्दा बनवला जात असल्याची खंतही त्यांनी व्यक्त करून दाखवली.
हे ही वाचा >>Jitendra Awhad : “मी एवढंच बोलेन की…”, आव्हाडांनी व्यक्त केला खेद, काय बोलले?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT