'त्याने माझ्यावर अनेक वार केले...', भारताचा ढाण्या वाघ... कॅप्टन स्मितचा हल्ल्यानंतरचा पहिला VIDEO

मुंबई तक

बुधवारी दुबईहून तेल अवीवला जाणाऱ्या फ्लायदुबईच्या FZ1073 विमानात भारतीय पायलट स्मित मछारवर त्याच्या सह-पायलटने हल्ला केला. गंभीर जखमी झालेल्या पायलटचा पहिला फोटो आता समोर आला आहे.

ADVERTISEMENT

he struck me several times but says blood soaked pilot smit machchhar video from after mid flight attack
कॅप्टन स्मित
Google CTA

ताबूक (सौदी अरब): दुबईहून तेल अवीवला जाणाऱ्या फ्लायदुबईच्या विमानात बुधवारी घडलेल्या भीषण घटनेनंतर आता काही व्हिडिओ समोर आले आहेत. या व्हिडिओमध्ये भारतीय पायलट स्मित मछार हल्ल्यानंतर गंभीर जखमी झालेला दिसत आहेत. त्याच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर जखमा स्पष्ट दिसत आहेत, पण त्यांचा आत्मविश्वास कायम आहे.

व्हिडिओमध्ये कॅप्टन स्मित अत्यंत गंभीर अवस्थेत दिसत आहे. कॉकपिटमध्ये आणि आजूबाजूला रक्त दिसत आहे. आरोपीचे हात बांधलेले असून प्रवाशांनी त्याला पकडले आहे. हल्ल्यात गंभीर जखमी होऊनही, स्मितने धैर्य दाखवले आणि विमानातील प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले. FZ1073 विमान नंतर सौदी अरेबियाकडे वळवण्यात आले आणि तिथे ते सुरक्षितपणे उतरवलं गेलं.

व्हिडिओमध्ये कॅप्टन स्मित असे म्हणताना दिसतोय की, "माझं डोकं दुखतंय. ते ठणकतंय. मला उशी द्या. मला झोपायचं नाहीये. माझा हात दुखतोय." एक प्रवासी असे म्हणताना ऐकू येतो, "त्यांनी (आरोपींनी) आमचं अपहरण करण्याचा प्रयत्न केला. आम्ही पायलटचं रक्षण करत आहोत. आरोपी को-पायलटने पायलटला ठार मारण्याचा प्रयत्न केला."

सुरक्षित लँडिंग व्हावी हीच स्मितची होती मुख्य चिंता

वृत्तानुसार, गंभीर जखमी झाल्यानंतरही, कॅप्टन स्मित यांची मुख्य चिंता स्वतःच्या जखमा नसून, विमानाची आणि त्यातील प्रवाशांची सुरक्षितता होती. त्यांना शुद्धीवर राहायचे होते, जेणेकरून गरज पडल्यास ते विमान उतरवण्यास मदत करू शकतील. या परिस्थितीला प्रतिसाद म्हणून, विमानाने आपत्कालीन स्थितीचा संकेत दिला आणि विमानातील ऑफ-ड्युटी पायलट्सनी सौदी अरेबियातील तबूक येथे आपत्कालीन लँडिंग केले. विमान सुरक्षितपणे उतरले आणि हल्ला करणाऱ्या को-पायलटला सौदी अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले.