India Canada Dispute : कॅनडातील भारतीयांसाठी सरकारची महत्वाची सुचना, अ‍ॅडव्हायजरीमध्ये काय?

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

india canada dispute narendra modi government issue advisery for indian citizen canadian advisory
india canada dispute narendra modi government issue advisery for indian citizen canadian advisory
social share
google news

Hardeep Singh Nijjar India Canada Dispute : खलिस्तान दहशतवादी हरदीप सिंग निज्जर यांच्या हत्याकांडाने सध्या भारत-कॅनडा संबंध ताणले गेले आहेत. भारत कॅनडामध्ये सध्या आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. असे असतानाच भारताने आता पुन्हा एकदा कॅनडाचे पंतप्रधान जस्टिस ट्रुडेओ यांना सडेतोड उत्तर दिले आहे. खरं तर केंद्रातील मोदी सरकारने कॅनडामध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी विशेषत: विद्यार्थ्यांसाठी एक अ‍ॅडव्हायजरी जारी केली आहे. या अ‍ॅडव्हायजरीत भारतीय नागरीकांना काय सूचना देण्यात आल्या आहेत, हे जाणून घेऊयात. (india canada dispute narendra modi government issue advisery for indian citizen canadian advisory)

ADVERTISEMENT

मोदी सरकारने कॅनडामध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी विशेषत: विद्यार्थ्यांसाठी एक अ‍ॅडव्हायजरी जारी केली आहे. कॅनडातील वाढत्या भारतविरोधी कारवाया आणि राजकीयदृष्ट्या समर्थित द्वेषपूर्ण गुन्हे आणि हिंसाचार पाहता, कॅनडामध्ये उपस्थित असलेल्या किंवा भेट देण्याचा विचार करत असलेल्या भारतीय नागरिकांना अत्यंत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन, या अ‍ॅडव्हायझरीमधून करण्यात आले आहे.

हे ही वाचा : Women Reservation Bill : ‘सरकारचं अपयश झाकण्यासाठी…’, ठाकरेंच्या खासदाराचा PM मोदींवर हल्लाबोल

दरम्यान मंगळवारी कॅनडा सरकारने भारतात राहणाऱ्या कॅनेडियन नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले होते. दहशतवादी हल्ल्यांचा धोका लक्षात घेता भारतात अत्यंत सावधगिरी बाळगली पाहिजे. शक्य असल्यास भारत प्रवास टाळावा असे कॅनडा सरकारने जारी केलेल्या अ‍ॅडव्हायझरीत म्हटले होते.

हे वाचलं का?

नेमका वाद काय?

हरदीप सिंग निज्जरच्या हत्याकांडाच्या तब्बल तीन महिन्यानंतर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडेओने भारतावर गंभीर आरोप केला होता. कॅनडाने हरदीप सिंग निज्जरच्या हत्येप्रकरणाचा तपास करून या हत्या प्रकरणात भारताचा सहभाग असल्याचा आरोप केला होता.या आरोपानंतर कॅनडा सरकारने तिथल्या भारताच्या उच्चायुक्तांची हक्कालपट्टी केली होती. त्यामुळे यावर आता भारताने सुद्धा त्यांना सडेतोड उत्तर दिले आहे.

ADVERTISEMENT

कॅनडाने भारताच्या उच्चायुक्तांची हक्कालपट्टी केल्यानंतर भारताने देखील देशातील कॅनडातील उच्चपदस्थ अधिकाऱ्याला भारत सोडण्याचे आदेश दिले आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत निवेदन जारी करून माहिती दिली. भारतात असलेल्या कॅनडाच्या एका उच्चाधिकाऱ्याला पुढच्या पाच दिवसांत भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Women Reservation : 5 कारणं… जी सांगतात महिलांना राजकारणात 33 टक्के आरक्षण का आवश्यक?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT