को-पायलटकडून चाकू हल्ला, जखमी अवस्थेतही भारतीय कॅप्टनने जीवाची बाजी लावून 180 प्रवाशांना वाचवलं
Indian pilot smit machhar : दुबईहून इस्रायलला जाणाऱ्या फ्लायदुबईच्या विमानात को-पायलटने कॅप्टनवर चाकूने हल्ला केल्याची माहिती आहे. जखमी अवस्थेतही भारतीय कॅप्टन स्मित मच्छार यांनी 180 प्रवाशांना सुरक्षित ठेवत विमानाचे आपत्कालीन लँडिंग केले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
को-पायलटकडून चाकू हल्ला,
जखमी अवस्थेतही भारतीय कॅप्टनने जीवाची बाजी लावली
180 प्रवाशांचे प्राण वाचवले
Indian pilot smit machhar : दुबईहून इस्रायलला जाणाऱ्या फ्लायदुबईच्या विमानात कॅप्टनवर चाकूने हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत भारतीय कॅप्टन स्मित मच्छार गंभीर जखमी झाले. मात्र, जखमी अवस्थेतही त्यांनी विमानावरील नियंत्रण सोडले नाही. विमानात 180 प्रवासी होते. कॅप्टन मच्छार यांनी प्रवाशांच्या मदतीने हल्लेखोराला नियंत्रणात आणले आणि विमानाचे सुरक्षितपणे आपत्कालीन लँडिंग केले. या घटनेनंतर इस्रायलमध्ये भारतीय पायलट स्मित मच्छार यांच्या धैर्याची चर्चा होत आहे.
हेही वाचा : Personal Finance: Digital Gold मध्ये लाखो रुपये गुंतवले, पण तुमच्यानंतर हे सोने कुणाला मिळणार?
झटापटीत कॅप्टन मच्छार गंभीर जखमी, तरीही जीवाची बाजी लावली
मिळालेल्या माहितीनुसार, विमान इस्रायलच्या दिशेने जात असताना मूळचा ओमानचा असलेल्या को-पायलटने कॅप्टन स्मित मच्छार यांच्यावर चाकूने हल्ला केला. को-पायलटने विमानातील अनेक यंत्रणांचे नुकसान करण्याचाही प्रयत्न केल्याची माहिती आहे. या झटापटीत कॅप्टन मच्छार गंभीर जखमी झाले. विमानातील प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, ते रक्तबंबाळ झाले होते आणि त्यांना बोलतानाही अडचण येत होती. मात्र, त्यांनी परिस्थितीवर नियंत्रण ठेवले आणि 180 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या विमानाचे सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग केले.
हेही वाचा : Maharashtra Weather: महाराष्ट्रात 1 ऑक्टोबरला पाऊस की ‘ऑक्टोबर हिट’? IMDचा अंदाज काय?
