Apple iphone 15 launch : आयफोन आता ‘सी टाईप’ ; वैशिष्ट्ये काय आणि किंमत किती?

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

Apple iPhone 15 and iPhone 15 Plus series : Display and color variants of iPhone 15, iPhone 15 series price, iPhone 15 series processor,
Apple iPhone 15 and iPhone 15 Plus series : Display and color variants of iPhone 15, iPhone 15 series price, iPhone 15 series processor,
social share
google news

iphone 15 specifications and price : Apple ने iPhone 15 या मालिकेअंतर्गत आयफोन 15 आणि आयफोन 15 प्लस हे दोन हँडसेट लॉन्च केले. कंपनीने या मालिकेत dynamic island चाही वापर केला. गेल्या वर्षी, कंपनीने आयफोन 14 प्रो सीरिजमध्ये dynamic island चा वापर केला होता, तर आयफोन 14 मध्ये स्टॅण्डर्ड नॉच होता. नव्या सीरिजमधील फोन अँड्रॉइड चार्जर म्हणजे सी टाईप चार्जरने चार्ज करता येणार आहेत. (Launched two handsets iPhone 15 and iPhone 15 Plus under the series. This time the company used dynamic island in this series also)

ADVERTISEMENT

iPhone 15 मध्ये बॅक पॅनलवर ड्युअल कॅमेरा सेटअप वापरण्यात आला आहे. यामध्ये प्रायमरी कॅमेरा 48MP आहे. कंपनीचा असा दावा आहे की, या कॅमेऱ्याने अधिक चांगले फोटो काढले जाऊ शकतात. तसेच, हा फोन फोटोंबद्दल आणखी चांगला अनुभव देऊ शकतो. यामध्ये यूजर्संना प्रकाश आणि डिटेल्सचे परिपूर्ण संतुलन असेल. नेक्स्ट जनरेशन पोर्ट्रेट मोड उपलब्ध असेल. यासोबतच एक नवीन फोकस मोड उपलब्ध होईल. हा फोकस मोड कमी प्रकाशात आणि दिवसाच्या प्रकाशात चांगले काम करेल. नवीन स्मार्ट HDR चांगले फोटो क्लिक करण्यास देखील मदत करेल.

हेही वाचा >> Neha Shourie : 100 कोटीचा घोटाळा उघड करणाऱ्या ड्रग इन्स्पेक्टरच्या मर्डरची Inside Story

iPhone 15 चे डिस्प्ले आणि कलर व्हेरियंट

iPhone 15 मध्ये 6.1 इंच डिस्प्ले आहे, तर iPhone 15 Plus मध्ये 6.7 इंच डिस्प्ले आहे. या दोन्ही हँडसेटमध्ये OLED सुपर रेटिना डिस्प्ले वापरण्यात आला आहे. iPhone 15 गुलाबी, पिवळा, हिरवा, निळा आणि काळा अशा पाच रंगांच्या प्रकारांमध्ये सादर करण्यात आला आहे.

हे वाचलं का?

आयफोन 15 सीरिज किंमत

iPhone 15 ची किंमत $799 (अंदाजे रु. 66,195), तर iPhone 15 Plus ची किंमत $899 (अंदाजे रु. 74,480) आहे. भारतात iPhone 15 ची सुरुवातीची किंमत 79,990 रुपये असेल, तर iPhone 15 Plus ची सुरुवातीची किंमत 89,990 रुपये असेल.

हेही वाचा >> Maratha Reservation : तामिळनाडूत 69 टक्के आरक्षण, मग महाराष्ट्रात का अशक्य?

आयफोन 15 सीरिज प्रोसेसर

iPhone 15 मध्ये A16 Bionic चिपसेट वापरण्यात आला आहे. यात 6 कोर CPU असेल, जो A15 Bionic पेक्षा 20 टक्के कमी उर्जा वापरतो. हे संपूर्ण दिवस बॅटरी चालेल.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> Maratha Reservation : 50 टक्क्यांची मर्यादा आली कारण…, सुप्रीम कोर्टाचा निकाल काय?

रोड साइड असिस्ट फीचर

रोड असिस्ट सेवा iPhone 15 मध्ये उपलब्ध असेल. आयफोन 15 सीरीज वापरकर्त्यांना दोन वर्षांसाठी सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी फीचर मोफत मिळेल. सॅटेलाइट कनेक्टिव्हिटीच्या मदतीने, वापरकर्ते आपत्कालीन परिस्थितीत स्थानिक अधिकाऱ्यांची मदत घेऊ शकतात. उपग्रह कनेक्टिव्हिटी इंटरनेट आणि सेल्युलर नेटवर्कशिवाय देखील कार्य करते.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT