लक्षात ठेवा! 1 जुलैपासून बदलणार हे नियम, चूक झाली तर भरावा लागू शकतो दंड?
परदेशात क्रेडिट कार्डच्या खर्चावर TCS ला पेन्शन योजनेअंतर्गत योगदान वाढवण्यापासून आणि आयकर रिटर्न भरण्यापासून अनेक महत्त्वाच्या गोष्टींची शेवटची तारीख फक्त जुलै आहे.
ADVERTISEMENT
जुलै महिन्यात अनेक महत्त्वाच्या गोष्टी कराव्या लागणार आहे. 1 जुलैमध्ये पैसा आणि आर्थिक व्यवहारांशी संबंधित अनेक तारखा आहेत, ज्या तुम्ही लक्षात ठेवायला हव्यात. या तारखा पगारदार लोक आणि करदात्यांसाठी विशेष महत्त्वाच्या आहेत. विषय पेन्शन योजनेत पैसे वाढण्याचा असो की, आयकर रिटर्नचा. अशी अनेक कामं आहेत, जी वेळीच पूर्ण केली नाही, तर दंड भरण्याची नामुष्की ओढवणार नाही. कारण 1 जुलैपासून काही नियम बदलणार आहेत. कोणते बदल होणार आहेत, तेच समजून घ्या…
ADVERTISEMENT
परदेशात क्रेडिट कार्ड खर्च महागणार
1 जुलै 2023 पासून परदेशात क्रेडिट कार्डच्या खर्चावर कर आकारला जाणार आहे. नवीन तरतुदीनुसार, क्रेडिट कार्डद्वारे विदेशात 7 लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च केल्यास 20 टक्के TCS भरावा लागणार आहे. मात्र, शिक्षण आणि आरोग्याशी संबंधित खर्चावर 5 टक्के टीसीएस आकारला जाणार आहे. याशिवाय, 0.5 टक्के TCS फी आकारण्यात येणार आहे, ज्यांनी 7 लाखांपेक्षा जास्त रकमेसाठी परदेशात शिक्षणासाठी कर्ज घेतले आहे. म्हणजेच परदेशात या गोष्टींवर क्रेडिट कार्डने खर्च केल्यास मूळ बिलासह करही भरावा लागणार आहे.
हेही वाचा >> PUNE: दर्शना पवारच्या हत्येसाठी नराधम राहुलने राजगड आणि सोमवारच का निवडला?
अधिक पेन्शन अर्ज भरण्याची शेवटची तारीख
जास्त पेन्शनसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 जुलैपर्यंत वाढवण्यात आली आहे. EPFO ने जास्त पेन्शन निवडण्यासाठी शेवटची तारीख दुसऱ्यांदा वाढवली आहे. यापूर्वी ती 3 मे वरून वाढवून 26 जूनपर्यंत वाढवण्यात आली होती.
हे वाचलं का?
ITR दाखल करण्याची तारीख
प्रत्येक करदात्याने इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत त्याचा प्राप्तिकर (ITR) भरणे आवश्यक आहे. शेवटची तारीख 31 जुलै आहे. तोपर्यंत तुम्ही भरू शकत नसाल, तर 31 डिसेंबरपर्यंत तुम्ही उशिराने उत्पन्न कर भरू शकता. मात्र, यासाठी दंड भरावा लागू शकतो. म्हणूनच 31 जुलैपर्यंत ITR भरणे कधीही चांगलेच आहे.
हेही वाचा >> शरद पवारांनी डाव टाकला, देवेंद्र फडणवीस-अजित पवार सापडले ‘ट्रॅप’मध्ये?
सिलेंडरचे दर
सरकारी तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी स्वयंपाकाच्या गॅसच्या किमती बदलतात. गॅस सिलिंडरचे दरही दर महिन्याच्या पहिल्या तारखेला निश्चित केले जातात. गेल्या मे महिन्यात पहिल्या तारखेला 19 किलो व्यावसायिक स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या किमतीत 171 रुपयांनी कपात करण्यात आली होती. 14 किलो एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे 1 जुलैला गॅसचे दर वाढणार, कमी होणार की आहे तसेच राहणार हे कळेल.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT