एका पाय नसलेली जीन्स! 'विचित्र फॅशन' Viral, या जीन्सची किंमत विचारूच नका...

मुंबई तक

Viral Jeans: फॅशनच्या जगात एक नवीन जीन्स सध्या प्रचंड चर्चेत आहे. जी आता फॅशन ट्रेंड बनत चालली आहे. जाणून घ्या याची नेमकी किंमत.

ADVERTISEMENT

एका पाय नसलेली जीन्स पाहिली का?
एका पाय नसलेली जीन्स पाहिली का?
social share
google news

Viral Fashion: फॅशनच्या जगात काय होईल हे कोणीही सांगू शकत नाही. आजकाल, एक विचित्र फॅशन ट्रेंड व्हायरल होत आहे - एक पाय असलेली जीन्स, जी पाहून लोक आश्चर्यचकित होत आहे. ही जीन्स फ्रेंच लक्झरी ब्रँड Coperni ने जगासमोर सादर केली आहे.

या जीन्सची किंमत तब्बल 38,330 रुपये ($ 440) आहे. काही फॅशन प्रेमी याला एक नवीन ट्रेंड मानत आहेत, तर बरेच लोक याला 'विचित्र' आणि 'अव्यवहार्य' म्हणत आहेत.

इन्फ्लुएंसरने ती जीन्स घातली, नवऱ्याने उडवली खिल्ली

1.6 कोटी फॉलोअर्स असलेल्या टिकटॉक स्टार क्रिस्टी साराने ही जीन्स वापरून पाहिली आणि याला 'इंटरनेटवरील सर्वात वादग्रस्त जीन्स' म्हटलं. पण तिचा नवरा डेसमंड त्यावर हसला आणि म्हणाला की कोणीही ही जीन्स घालू शकत नाही!

हे ही वाचा>> आरारारा खतरनाक! रेल्वे फाटक बंद झालं..चक्क बाईकच खांद्यावर उचलून पलीकडे गेला, बाहुबलीचा Video व्हायरल

याबाबत सोशल मीडियावर मजेदार प्रतिक्रिया आल्या आहेत. कोणीतरी म्हटले की, ही जीन्स अशी वाटतेय की, जणू काही एक पाय बाहेर काढून झोपत आहोत, तर कोणीतरी असा प्रश्न केला की हे खरोखर ट्रेंडमध्ये आहे का आणि लोक हे घालून रस्त्यावर चालतील का? त्याच वेळी, कोणीतरी म्हटले की, जेव्हा हे ट्रेंड होईल तेव्हा या जीन्स देखील सामान्य दिसू लागतील.

हे वाचलं का?

    follow whatsapp