Mazi Ladki Bahin Yojana Installment : रक्षाबंधनाची ओवाळणी! पहिला हफ्ता कधी जमा होणार?

मुंबई तक

ADVERTISEMENT

माझी लाडकी बहीण योजना पैसे कधी मिळणार?
माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हफ्ता कधी जमा होणार आहे?
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी मिळणार?

point

माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हफ्ता किती रुपयांचा असणार?

point

अजित पवार यांनी काय दिली माहिती?

Majhi ladki bahin yojana first installment : राज्य सरकारने राज्यातील महिलांसाठी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' लागू केली. या योजनेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. १ जुलै २०२४ पासून महिलांना पैसे मिळणार असून, योजनेचा पहिला हफ्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात कधी जमा होणार याची तारीखही समोर आली आहे. (majhi ladki bahin yojana first installment date)

ADVERTISEMENT

Mazi Ladki Bahin Yojana : अर्ज भरण्याची शेवटची तारीख आली जवळ

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज करण्यासाठी सरकारकडून कालमर्यादा ठरवून देण्यात आली आहे. आधी 31 जुलै 2024 पर्यंत मुदत देण्यात आली होती. त्याला मुदतवाढ देण्यात आली. आता 31 ऑगस्ट 2024 अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. 

Mazi ladki bahin yojana 1st installment : महिलांना 1500 रुपये कधी मिळणार?

राज्यातील ज्या महिला माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरतील, त्यांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये, तर वर्षाला 18000 रुपये शासनाकडून दिले जाणार आहेत.

हे वाचलं का?

हेही वाचा >> Mazi Ladki Bahin Yojana Documents : 'ही' चार कागदपत्रे हवीच, नाहीतर अर्ज होईल बाद!

या योजनेचा पहिला हफ्ता कधी मिळणार, याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार यांनी माहिती दिली. पहिला हफ्ता जमा करण्यासाठी सरकारने रक्षाबंधनाचा मुहूर्त साधला आहे. लाभार्थी महिलांच्या खात्यात 19 ऑगस्ट 2024 रोजी योजनेचे पैसे जमा होणार आहेत. जुलै आणि ऑगस्ट असे दोन्ही महिन्यांचे मिळून 3000 हजार रुपये जमा केले जाणार आहेत.

हेही वाचा >> Mukhyamantri Teerth Darshan Yojana : कोणाला करता येणार अर्ज? पात्रता, नियम आणि अटी काय? 

माझी लाडकी बहीण योजनेसाठी सरकारने एका वर्षासाठी 46 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिला या योजनेसाठी अर्ज करू शकणार आहेत. त्यासाठी कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक असून, उत्पन्न दाखला नसेल, तर पिवळे वा केशरी रेशन कार्डही ग्राह्य धरले जाणार आहे. 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT