Mukhyamantri Teerth Darshan Yojana : कोणाला करता येणार अर्ज? पात्रता, नियम आणि अटी काय?

मुंबई तक

ADVERTISEMENT

महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेची संपूर्ण माहिती वाचा.
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेची संपूर्ण माहिती
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना काय आहे?

point

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना पात्रता आणि निकष

point

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेसाठी कोण अर्ज करू शकतो?

Mukhyamantri Teerth Darshan Yojana Maharashtra online Registration : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबरोबरच महाराष्ट्र सरकारने राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना लागू केली आहे. या योजनेसाठी महाराष्ट्रातील कोणते नागरिक पात्र असतील? मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचे निकष आणि नियम काय आहेत? याबद्दलची संपूर्ण माहिती वाचा... (What is terms and conditions of mukhyamantri teerth darshan yojana maharashtra)

ADVERTISEMENT

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरू करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली असून, त्यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. 

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना पात्रता

- अर्जदाराचे वय ६० वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असावे. 

हे वाचलं का?

- अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा.

- लाभार्थीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दोन लाख पन्नास हजार रुपयांपेक्षा जास्त नसावे.

ADVERTISEMENT

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना अपात्रतेचे निकष

ADVERTISEMENT

- कुटुंबातील सदस्य आयकर भरत असेल, तर अशी व्यक्ती अपात्र ठरेल.

- ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित, कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभागा, उपक्रम, मंडळ, केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थामध्ये कार्यरत आहेत. किंवा सेवानिवृत्तीनतंर निवृत्तीवेतन घेत आहेत, असा अर्जदार अपात्र ठरेल. 

-अडीच लाख रुपये उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी यासाठी पात्र असतील. 

- कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी आमदार, खासदार असल्यास अर्जदार अपात्र ठरेल. 

- ज्यांच्या कुटुंबातील सदस्य केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड,कॉर्पोरेशन, उपक्रम याचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक आणि सदस्य असेल तो अपात्र ठरेल.

- ज्याच्याकडे चारचाकी वाहने (ट्रॅक्टर वगळून) त्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर असेल, तर तो अर्जदार अपात्र ठरेल.

- प्रवासासाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे. कोणत्याही संसर्गजन्य रोगाने ग्रस्त नसावे. उदाहरणार्थ टीबी, ह्रदयाशी संबंधित श्वसन रोग, कोरोनरी अपुरेपणा, कोरोनरी थ्रोबोसिस, मानसिक आजार, संसर्गजन्य कुष्ठरोग इत्यादी.

- अर्जासोबत ज्येष्ठ नागरिकाला सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्याने पूर्ण आरोग्य तपासणी केल्यानंतर ती व्यक्ती शारीरिकदृष्ट्या निरोगी आणि प्रस्तावित प्रवासासाठी सक्षम असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल. (हे प्रमाणपत्र प्रवासाच्या तारखेपासून १५ दिवसांपेक्षा जास्त जुने नसावे.)

- जे अर्जदार मागील वर्षांमध्ये लॉटरीत निवडले गेले होते, परंतु प्रवासासाठी आमंत्रित करूनही त्यांनी प्रवास पूर्ण केला नाही, अशा माजी अर्जदारांना देखील या योजनेत पात्र ठरवले जाणार नाही. 

- असे आढळून आले की, अर्जदाराने खोटी प्रवाशाने खोटी माहिती देऊन किंवा कोणतीही तथ्ये लपवून अर्ज केला आहे ज्यामुळे तो/तिला प्रवासासाठी अपात्र ठरते, तर त्याला/तिला कधीही योजनेच्या लाभांपासून वंचित ठेवले जाईल.

योजनेचा संपूर्ण शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा View PDF

Mukhyamantri teerth darshan yojana important documents : कोणती कागदपत्रे आवश्यक?

- अर्जदाराचा ऑनलाईन अर्ज.

- आधार कार्ड/रेशन कार्ड

- रहिवाशी प्रमाणपत्र. रहिवाशी प्रमाण नसल्यास १५ वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड किंवा मतदार ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला... या चारपैकी एक प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाईल.

- उत्पन्नाचा दाखला किंवा पिवळे/केशरी रेशनकार्ड.

- वैद्यकीय प्रमाणपत्र

- पासपोर्ट आकाराचा फोटो.

- जवळच्या नातेवाईकाचा मोबाईल क्रमांक

- योजनेच्या अटी आणि शर्तींचे पालन करण्याबद्दलचे हमीपत्र.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT