"ये, तुला एअर होस्टेसची नोकरी देतो..." एक-एक करून 40 जणींना जाळ्यात अडकवलं अन्...

मुंबई तक

एअर होस्टेस म्हणून नोकरी देण्याच्या बहाण्याने एक किंवा दोन नाही तर तब्बल 40 जणींना जाळ्यात अडकवल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.

ADVERTISEMENT

40 जणींना जाळ्यात अडकवलं अन्...
40 जणींना जाळ्यात अडकवलं अन्...
social share
google news

बातम्या हायलाइट

point

"ये, तुला एअर होस्टेसची नोकरी देतो..." बनावट कॉल अन्...

point

एक-एक करून 40 जणींना जाळ्यात अडकवलं

Crime News: एअर होस्टेस म्हणून नोकरी देण्याच्या बहाण्याने एक किंवा दोन नाही तर तब्बल 40 जणींना जाळ्यात अडकवल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. या टोळीने एअर होस्टेस बनू इच्छिणाऱ्या आणि नोकरीच्या शोधात असलेल्या मुलींना टार्गेट केलं. त्यानंतर, आपल्या जाळ्यात अडकवून त्यांची मोठी फसवणूक केली. नेमकं प्रकरण काय? सविस्तर जाणून घ्या. 

एअरलाइन क्रू मेंबरच्या आकर्षक नोकरीचं आमिष

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणींनी OLX वर आपली नावे नोंदवली होती. त्यांची नावे रजिस्टर होताच, त्यांच्या मोबाईल फोनवर नवीन नोकरीच्या ऑफर येऊ लागल्या. या ऑफरपैकी एक म्हणजे एअरलाइन क्रू मेंबर बनणे. टेलीकॉलरने पीडितांना एअरलाइन क्रूच्या कामाचे एक आकर्षक जग दाखवलं आणि त्यामुळे तरुणी त्यांच्या जाळ्यात अडकल्या. त्यांनी या नोकरीमध्ये रस दाखवला आणि त्यानंतर, फसवणूक करणाऱ्या टोळीचं प्लॅनिंग सुरू झालं. या नोकरीमध्ये इंटरेस्ट दाखवलेल्या तरुणींकडून त्यांनी सिक्योरिटी डिपॉजिट म्हणून 2,500 रुपयांची ची मागणी केली. 

टप्प्याटप्प्याने पैसे उकळले अन् फोन बंद केले...

यानंतर पीडित तरुणींकडून युनिफॉर्म आणि शूजच्या नावाखाली 5,000 ते 8,000 रुपये घेण्यात आले. याशिवाय, नोकरीचं आश्वासन देऊन सॅलरी अकाउंट (पगाराचं खातं) उघडण्याच्या बहाण्याने 10,000 ते 15,000 रुपये उकळले गेले. पैसे मिळाल्यानंतर, आरोपींनी त्यांना फोन बंद केला. त्यानंतर, पीडित तरुणींना आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलं. खरं तर, कमी रक्कम असल्यामुळे त्यातील बहुतेक तरुणी गप्प राहिल्या, परंतु एका पीडितेने दिल्ली पोलिसांकडे याबाबत तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर, कारवाई करत दिल्ली पोलिसांनी टोळीतील सात महिलांसह नऊ जणांना अटक केली.

हे ही वाचा: रात्री घराबाहेर पडली अन् सकाळी अर्धनग्न अवस्थेत सापडला तरुणीचा मृतदेह... नेमकं काय घडलं?

ही टोळी टिळक नगरमधील गणेश नगर परिसरात बनावट कॉल सेंटर चालवत होती. या कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या मुली पीडितांना आपल्या जाळ्यात ओढत होत्या. या कामासाठी त्यांना दरमहा 15,000 रुपये दिले जात होते. या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या एका टेलिकॉम कंपनीच्या कर्मचाऱ्याने ग्राहकांच्या बायोमेट्रिक माहितीचा गैरवापर करून त्यांच्या नावावर बनावट सिम कार्ड जारी केल्याचंही पोलिस तपासात समोर आलं आहे. नंतर या सिम कार्डचा कॉल सेंटरमध्ये तरुणींची फसवणुकी करण्यासाठी वापर करण्यात आला. 

हे वाचलं का?

    follow whatsapp