'बाबा मला मारलं म्हणून कोणीतरी दिल्लीला गेलं होतं... ', उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
Uddhav Thackeray attack on Eknath Shinde : 'बाबा मला मारलं म्हणून कोणीतरी दिल्लीला गेलं होतं... ', उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
'बाबा मला मारलं म्हणून कोणीतरी दिल्लीला गेलं होतं... ',
उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
Uddhav Thackeray attack on Eknath Shinde : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली भेटीवर नाव न घेता उपरोधिक टीका केली आहे. “एक कोणीतरी दिल्लीला गेलं होतं बाबा मला मारलं म्हणून” असा उद्धव ठाकरेंनी लगावलाय. “जे दिवटे निघाले आहेत, त्यांना मशालीचे महत्त्व कळणार नाही, त्यांच्यात आपलाल्या नसा आवळणं सुरू झालं आहे” असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेकडून डिजिटल बोर्ड वाटप कार्यक्रमात ते बोलत होते.
"दिवटी म्हणजे मशाल आणि दिवटा म्हणजे.."
उद्धव ठाकरे म्हणाले, “मी कार्यक्रम छोटा की मोठा हे पाहत नाही, कामाची साईज पाहतो. आयुष्यात चांगले शिक्षक आणि शिक्षण नाही मिळालं तर काय होतं ते दिसत आहे. दिवटी म्हणजे मशाल आणि दिवटा म्हणजे…,” असे ठाकरेंनी म्हणताच उपस्थितांनी जोरदार हशा केला. “असे जे दिवटे निघाले आहेत, त्यांना मशालीचे महत्व समजणार नाही आणि कळलेलं नाही.” असंही ठाकरे म्हणाले.
पुढे बोलताना उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, “शिवसेनेतून शिक्षक मतदारसंघातून तुम्ही निवडून दिलेला लोकप्रतिनिधी कोणताही वाह्यातपणा न करता विधानपरिषदेत आणि कामातही वेगळी ओळख निर्माण करत आहे. तुमचा आमदारकीचा निधी फक्त शिक्षणासाठी वापरा. हा निधी विरोधी पक्षाचा आमदार म्हटल्यानंतर मुठी आवळल्या, नाड्या आवळल्या हे आपण पेपरमध्ये वाचतो,”
शिंदे गटातील नेत्यांमध्ये असलेली नाराजी आणि दिल्ली दौऱ्याबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “आता कहर म्हणजे त्यांच्यात आपलाल्या नसा आवळणं सुरु झालं आहे. एक कोणीतरी बाबा मला मारलं म्हणून दिल्लीला गेले आहेत. ही लाचारी का? चांगला शिक्षक त्या वयात मिळाला असता तर ही परिस्थिती आली नसती. त्यांना मिळाला असता तर हे झाले नसते.”










