सासऱ्याचे सुनेसोबत अनैतिक संबंध! नवऱ्याने दोघांना 'त्या' अवस्थेत पाहिलं अन् घडली भयानक घटना...

मुंबई तक

एका महिलेचे तिच्याच सासऱ्यासोबत अनैतिक प्रेमसंबंध होते. एके दिवशी, तिच्या नवऱ्याने तिला सासऱ्यासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिलं आणि त्यानंतर भयानक घटना घडली.

ADVERTISEMENT

नवऱ्याने दोघांना 'त्या' अवस्थेत पाहिलं अन्...
नवऱ्याने दोघांना 'त्या' अवस्थेत पाहिलं अन्...
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सासऱ्याचे सुनेसोबत अनैतिक संबंध!

point

नवऱ्याने दोघांना 'त्या' अवस्थेत पाहिलं अन् घडली भयानक घटना..

Crime News: उत्तर प्रदेशातील बिजनौर येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका तरुणाचा मृतदेह शेतात आढळल्याने गावात एकच खळबळ उडाली. 14 नोव्हेंबर रोजी गावातील एक सौरभ नावाचा तरुण बेपत्ता असल्याची पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली. संबंधित तरुणाच्या वडिलांनीच आपला मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती. तपासादरम्यान, 15 नोव्हेंबर रोजी शेतात गावकऱ्यांना मृतदेह आढळला. त्यावेळी, जंगली प्राण्याने जीवघेणा हल्ला केल्याने सौरभचा मृत्यू झाल्याचं वडिलांनी पोलिसांना सांगितलं. 

जेव्हा पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी सौरभचा मृतदेह पाहिला तेव्हा जंगली प्राण्याच्या हल्ल्यामुळे सौरभचा मृत्यू झाला नसल्याचं स्पष्ट झालं. मृतदेहावरून स्पष्ट झालं की सौरभची हत्या करण्यात आली होती. बिजनोर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. रिपोर्ट्समध्ये सौरभच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याचं उघडकीस आलं. त्याच्या डोक्यावर बरेच वार करण्यात आले होते आणि यामुळे त्याची कवटी फ्रॅक्चर झाली आणि यात त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आणि यासंबंधी तपास सुरू केला.

आरोपी वडिलांनी केला गुन्हा कबूल 

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता सासरे आणि सुनेतील प्रेमसंबंध उघडकीस आलं. सौरभचे वडील सुभाषचे त्याच्याच सुनेसोबत अनैतिक संबंध होते. दरम्यान, सौरभची पत्नी पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली. तिने आपल्या पतीच्या हत्येप्रकरणी तिच्या सासऱ्यांविरुद्ध तक्रार दाखल केली. तपासादरम्यान, मृत सौरभचे वडील सुभाषवर पोलिसांचा संशय बळावला. अखेर, पोलिसांनी सुभाषला ताब्यात घेतलं आणि त्याची चौकशी सुरू करण्यात आली. चौकशीदरम्यान, सुभाषने त्याचा गुन्हा कबूल केला. खरं तर, 60 वर्षीय आरोपी सुभाषनेच आपल्या 30 वर्षांच्या मुलाची हत्या केली होती. 

हे ही वाचा: मुंबईची खबर: आता मुंबई मेट्रो लाइन-3 वर बनणार दोन नवीन सबवे... काय आहे MMRCL चा 'हा' प्लॅन?

अनैतिक संबंधामध्ये अडथळा ठरत असल्याने मुलाची हत्या 

रिपोर्ट्सनुसार, सौरभने एके दिवशी त्याच्या वडिलांना पत्नी सुनीतासोबत संबंध ठेवताना पाहिलं. आपल्या वडील आणि पत्नीच्या अनैतिक संबंधाबद्दल त्याला कळालं. सौरभने या नात्याला विरोध करत वडील आणि पत्नीला समजावण्याचा प्रयत्न केला. यामुळे, आपला मुलगा अनैतिक संबंधामध्ये अडथळा ठरत असल्याचं आरोपी सुभाषला वाटलं. आरोपीला वाटायचं की सौरभ त्याला त्याच्या सुनेपासून दूर करेल आणि तिच्या जवळ जाण्यापासून रोखेल. याच कारणामुळे, सुभाषने स्वतःच्या मुलाची हत्या करण्याचा निर्णय घेतला. 

हे वाचलं का?

    follow whatsapp