रात्री घराबाहेर पडली अन् सकाळी अर्धनग्न अवस्थेत सापडला तरुणीचा मृतदेह... नेमकं काय घडलं?

मुंबई तक

सकाळी काही गावकऱ्यांना जवळच्या नदीत तरुणीचा अर्धनग्न अवस्थेत मृतदेह आढळला. तो मृतदेह रात्रभर बेपत्ता असलेल्या तरुणीचा असल्याचं स्पष्ट झालं.

ADVERTISEMENT

नदीत अर्धनग्न अवस्थेत तरुणीचा मृतदेह...
नदीत अर्धनग्न अवस्थेत तरुणीचा मृतदेह...
social share
google news

बातम्या हायलाइट

point

रात्री शेण टाकण्यासाठी घराबाहेर पडली अन्...

point

सकाळी नदीत अर्धनग्न अवस्थेत तरुणीचा मृतदेह..

Crime News: उत्तर प्रदेशातील एटा येथे नदीत एका तरुणीचा अर्धनग्न अवस्थेत मृतदेह सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. संबंधित तरुणी ही B.A ची विद्यार्थिनी असून ती रात्रीच्या वेळी शेण टाकण्यासाठी घराबाहेर पडली. त्यानंतर ती अचानक गायब झाली. तिच्या कुटुंबियांनी रात्रभर मुलीचा शोध घेतला, पण अखेर ती सापडलीच नाही.  सकाळी काही गावकऱ्यांना जवळच्या काक नदीत तरुणीचा अर्धनग्न अवस्थेत मृतदेह आढळला. तो मृतदेह रात्रभर बेपत्ता असलेल्या तरुणीचा असल्याचं स्पष्ट झालं. 

नेमकं काय घडलं? 

ज्या परिस्थितीत संबंधित तरुणीचा मृतदेह सापडला त्यामुळे कुटुंबियांना आणि गावकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. तिच्यासोबत नेमकं घडलं? आरोपींनी तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या केली का? की यामागे वेगळंच काहीतरी कारण आहे? असे बरेच प्रश्न उपस्थित होत आहेत. 

हे ही वाचा: जखमेवर टाके घालण्याऐजवी डॉक्टरांनी फेवीक्विक लावलं! अडीच वर्षांच्या चिमुकल्यासोबत धक्कादायक प्रकार...

पीडितेच्या कुटुंबियांनी दिली माहिती 

मृत तरुणी ही एका शेतकरी कुटुंबातील असल्याची माहिती आहे. कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला आणि नंतर तिची हत्या करण्यात आली. त्यांच्या म्हणण्यानुसार, तरुणी रात्रीच्या वेळी शेण टाकण्यासाठी घरातून बाहेर पडली आणि सोमवारी सकाळी तिचा नदीत अर्धनग्न अवस्थेत मृतदेह सापडला.

हे ही वाचा: मुंबईची खबर: आता मुंबईतील 'या' मार्गावर धावणार मेट्रो! लाइन-11 ला मिळाला ग्रीन सीग्नल...

पोलिसांचा तपास 

पोलिसांनी घटनास्थळी श्वान पथक आणि फील्ड युनिटला बोलवून तपास सुरू केला. ज्या ठिकाणी पीडितेचा मृतदेह आढळला तो परिसर सील करण्यात आला आहे. पोलीस आता या प्रकरणाबाबत पुरावे शोधत आहेत. आता तरुणीच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टची पोलिसांना प्रतिक्षा आहे. यामधून तिची हत्या कशी झाली आणि तिच्यासोबत नेमकं काय घडलं? हे स्पष्ट होऊ शकेल. पोलिसांनी सध्या या घटनेबाबत गुन्हा दाखल केला आहे. लवकरच संपूर्ण प्रकरणाचा उलगडा होणार असल्याचं पोलीस अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. 
 

हे वाचलं का?

    follow whatsapp