मुंबईची खबर: आता मुंबईतील 'या' मार्गावर धावणार मेट्रो! लाइन-11 ला मिळाला ग्रीन सीग्नल...
आता सरकारने मेट्रो लाइन-11 ला मंजूरी दिल्याची माहिती समोर आली आहे. ही बहुप्रतिक्षित मेट्रो लाइन-11 वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया दरम्यान असणार आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
आता मुंबईतील 'या' मार्गावर धावणार मेट्रो!
मुंबई लाइन-11 ला मिळाला ग्रीन सीग्नल...
Mumbai News: मेट्रोमुळे मुंबईतील नागरिकांचा प्रवास अधिक सोयीस्कर होत असल्याचं पाहायला मिळतंय. आता सरकारने मेट्रो लाइन-11 ला मंजूरी दिल्याची माहिती समोर आली आहे. ही बहुप्रतिक्षित मेट्रो लाइन-11 वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया दरम्यान असणार आहे. सरकारने मेट्रोच्या या मार्गिकेला अधिकृत मंजूरी दिल्याचं वृत्त आहे.
शहरी विकास विभागाने 18 नोव्हेंबर 2025 रोजी जारी केलेल्या जीआरच्या माध्यमातून याची पुष्टी करण्यात आली. मेट्रोच्या कॉरिडोरसाठी एकूण 23,487.51 कोटी रुपये खर्च केले जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. यामध्ये मेट्रो डिपोच्या निर्मितीचा सुद्धा समावेश आहे. या प्रोजेक्टला लायबिलिटी क्लॉजमध्ये महत्त्वपूर्ण बदलांसह फायनल स्टेट अप्रूव्हल मिळालं.
हे ही वाचा: Govt Job: इंटेलिजन्स ब्युरोमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 'या' मोठ्या पदांसाठी निघाली भरती... कधीपर्यंत कराल अर्ज?
17.51 लांब मेट्रो लाइन
ही लाइन-11 मुंबई मेट्रो लाइन-4/4A चा विस्तार आहे. मेट्रोच्या या लाइनची 17.51 लांबी किमी असणार आहे. या लाइनवर एकूण 13 अंडरग्राउंड आणि 1 एट-ग्रेड स्टेशनचा समावेश आहे. याच्या बांधकामाची जबाबदारी सुद्धा मुंबई मेट्रो रेल मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (एमएमआरसीएल) वर असणार आहे. मेट्रोची ही मार्गिका वडाळा, शिवडी, फिरोजशाह मेहता रोड, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT), काळा घोडा मार्गे थेट गेटवे ऑफ इंडियाकडे जाईल.
हे ही वाचा: लग्न कर म्हणून मागे लागल्याने मामा संतापला, भाचीला थेट धावत्या ट्रेनमधून ढकललं, वसईतील धक्कादायक घटना
दक्षिण मुंबईसाठी गेम चेंजर
मुंबई मेट्रोची लाईन 11 ही दक्षिण शहरातील भागांसाठी गेम चेंजर ठरू शकते. सध्या वाहतूक कोंडीमुळे वडाळ्याहून कुलाबा किंवा गेटवेवर पोहोचण्यात वेळ वाया जातो. नवीन मेट्रो लाईन सुरू झाल्यानंतर प्रवाशांना जलद आणि थेट कनेक्टिव्हिटी मिळेल आणि यामुळे रस्ते तसेच रेल्वे नेटवर्कवरील ताण कमी होण्याची अपेक्षा आहे. सध्या, मुंबईतील मेट्रो सुमारे 81 किलोमीटरच्या नेटवर्कवर चालत आहे. यात जर एमएमआरचा समावेश केला तर भविष्यात एकूण 337 किलोमीटरच्या मोठ्या मेट्रो नेटवर्कचे नियोजन आहे. यामध्ये एकूण 16 लाइन्स असतील.










