श्वान खोदू लागले माती, अचानक तरुणीचा दिसला हात, पुरलेला मृतदेह पोलिसांनी बाहेर काढला, घटनास्थळी बॅग, सिंदूर...
crime News : एका तरुणाने त्याच्याच मैत्रिणीची हत्या केली. त्यानंतर त्याने तिचा मृतदेह एका बागेत पुरला. या घटनेची माहिती पोलिसांना समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि सर्व तपास करून घटनास्थळावरील काही वस्तू आपल्या ताब्यात घेतल्या.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
साक्षीचे तरुणावर जीवापाड प्रेम
बॅगेवर तरुणाचे नाव
माती उकरताना मृतदेहाचा दिसला हात
नेमकं प्रकरण काय?
Crime News : उत्तर प्रदेशातील प्रयागराज जिल्ह्यात लखराव गावात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका तरुणाने त्याच्याच मैत्रिणीची हत्या केली. त्यानंतर त्याने तिचा मृतदेह एका बागेत पुरला. या घटनेची माहिती पोलिसांना समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि सर्व तपास करून घटनास्थळावरील काही वस्तू आपल्या ताब्यात घेतल्या. तेव्हा पोलिसांचे पथक श्वानांसह घटनास्थळी दाखल झाले होते. तेव्हा त्याच ठिकाणी मृतदेहाचा हात बाहेर दिसला आणि तो हात दुसरा तिसरा कोणाचा नसून हत्या करण्यात आलेल्या तरुणीचा होता. तिचं नाव साक्षी यादव (वय 17) असे आहे. तर आरोपीचे नाव हर्षवर्धन सिंह असून तो सैन्यदलात कार्यरत असल्याची माहिती समोर आली.
हे ही वाचा : बायकोच्या पोटात वाढत होतं बाळ, पतीने तिला लाथ मारली, नंतर 'त्या' कारणावरून स्कार्फने गळा आवळत... धक्कादायक कांड
नेमकं प्रकरण काय?
दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळावरून मृतदेह ताब्यात घेतला आणि नंतर शवविच्छेदनासाठी पाठवला. अशातच या मृतदेहाला काही दिवस उलटून गेले होते. तरुणीची 10 नोव्हेंबर दिवशी हत्या झाली होती आणि मृतदेह जमिनीत पुरण्यात आला होता. त्याच ठिकाणी तरुणीची बॅग पडली होती. पोलिसांनी एक पथक तयार केलं आणि तपासातून खळबळजनक प्रकार उघडकीस आला.
बॅगेवर तरुणाचे नाव
संबंधित प्रकरणात एका वृत्तमाध्यमानुसार, तरुणी साक्षीचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला. घटनास्थळी तरुणीच्या काही वस्तू पडलेल्या होत्या. पोलिसांनी त्या वस्तू आपल्या ताब्यात घेतल्या. तेव्हा त्या बॅगेवर तरुणाचे नाव लिहिलेलं आढळून आलं. तेव्हाच पोलिसांना या प्रकरणात एक भलताच संशय आला. पोलिसांनी घटनास्थळावरील सर्वच सीसीटीव्ही तपासले असता, तरुणी साक्षी ही हर्षदच्या मोटारसायकलवर दिसली. त्यानंतर पोलिसांनी तपास केल्यानंतर आरोपी हर्षवर्धनला आपल्या ताब्यात घेतलं.
साक्षीचे तरुणावर जीवापाड प्रेम
दरम्यान, हर्षवर्धनचं नुकताच विवाह ठरला होता. पण त्याच्यावर साक्षीचे जीवापाड प्रेम होते. ते एकमेकांना आधीपासून ओळखत होते. त्यांची सोशल मीडियावर मैत्री अधिकच घट्ट झाली होती. त्यानंतर मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. हर्षवर्धनचा विवाह ठरल्याने साक्षीने त्याला विवाह करण्यास विरोध केला, पण नंतर हर्षवर्धनने तिला भेटायला बोलावले आणि मोटारसायकलवर बसवून एका बागेत नेत तिची हत्या केली आणि नंतर तिचा मृतदेह पुरला.









