Maharashtra Weather : 9 जिल्ह्यांना IMD चा सतर्कतेचा इशारा, कुठे कसा असेल पाऊस?

मुंबई तक

Maharashtra Weather Forecast : पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्हे आणि कोकणासह महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 

ADVERTISEMENT

मुंबई, महाराष्ट्रात हवामान कसे असेल?
मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, नागपूर आणि महाराष्ट्रातील हवामानाचा अंदाज काय?
social share
google news

बातम्या हायलाइट

point

महाराष्ट्रातील हवामानाचा अंदाज काय?

point

मुंबईमध्ये पावसाचा जोर वाढणार की कमी होणार?

point

हवामान विभागाने कोणत्या जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला?

Mumbai Weather forecast : राज्याची राजधानी मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार ते अतिवृष्टी सदृश्य पावसाचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला असून, पुण्यासह काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. (IMD Issued red and orange alert many districts of maharashtra including raigad, pune satara, kolhapur)

महाराष्ट्र हवामान अंदाज -24 जुलै 

भारतीय हवामान विभागाने बुधवारी (24 जुलै 2024) महाराष्ट्रातील अनेक भागामध्ये अतिमुसळधार ते अतिवृष्टी सदृश्य पावसाचा इशारा दिला आहे. 

रायगड, सातारा जिल्ह्याला रेड अलर्ट

कोकणातील रायगड जिल्ह्यात आणि पश्चिम घाटाला लागून असलेल्या सातारा जिल्ह्यामध्ये पुढील २४ तासांत अतिमुसळधार ते अतिवृष्टी सदृश्य पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या दोन्ही जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे.

हेही वाचा >> 'राज्यातल्या जमिनी विकून पैसे देऊ का?', अजितदादा संतापले 

पुणे, ठाणे, कोल्हापूरसह 7 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, जोरदार पावसाचा अंदाज

ठाणे, पालघर, नाशिक, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. यातील काही जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp