लाइव्ह

Maharashtra News live : विश्वजित कदम-विशाल पाटलांना उद्धव ठाकरे भेटले, पण...

मुंबई तक

ADVERTISEMENT

उद्धव ठाकरे दिल्लीत असताना विश्वजित कदम, खासदार विशाल पाटील यांनी भेट घेतली.
विश्वजित कदम, विशाल पाटील यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली.
social share
google news

Maharashtra breaking news in marathi : महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाराष्ट्रात ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे वाटाघाटी आणि रणनीतीवर राजकीय पक्षांनी लक्ष्य केंद्रीत केले आहे. दिल्लीपासून मुंबईपर्यंत राजकीय घडामोडींना वेग आला असून, सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडीत आरोप-प्रत्यारोप वाढले आहेत. 

ADVERTISEMENT

राज्यात आरक्षणाचा मुद्दाही संवेदनशील बनला आहे. मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे पाटील यांची दुसऱ्या टप्प्यातील शांतता रॅली आजपासून सुरू होत आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीने काढलेल्या ओबीसी आरक्षण बचाओ यात्रेचा आज समारोप होत आहे. 

या महत्त्वाच्या मुद्द्यांबरोबरच महाराष्ट्र आणि देशातील महत्त्वाच्या घडामोडींचे ताजे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

 

ADVERTISEMENT

  • 12:04 PM • 07 Aug 2024

    Ajit Pawar : कसा असणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा जनसन्मान यात्रेचा दौरा?

    नाशिक :
    ८ ऑगस्ट - नाशिक - दिंडोरी आणि देवळाली
    ९ ऑगस्ट - नाशिक - निफाड आणि येवला
    १० ऑगस्ट - नाशिक - सिन्नर आणि अहिल्यानगर - कोपरगाव
    ११ ऑगस्ट - नाशिक - चांदवड आणि कालवण
    १२ ऑगस्ट - धुळे शहर - जळगाव अमळनेर - नाशिक  मालेगाव मध्य

    १३ ऑगस्ट आणि १४ ऑगस्ट दोन दिवस अजित पवार हे मुंबईत असणार

    पुणे : 
    १५ ऑगस्ट - पुण्यात ध्वजारोहण त्यानंतर वडगाव शेहरी आणि हडपसर
    १६ ऑगस्ट - मावळ आणि पिंपरी
    १७ ऑगस्ट - खेड आळंदी आणि शिरूर
    १८ ऑगस्ट - दौंड आणि इंदापूर

    मुंबई :
    १९ ऑगस्ट - वांद्रे पूर्व आणि कुर्ला
    २० ऑगस्ट आणि २१ ऑगस्ट ला मुंबईत इतर कामे
    २२ ऑगस्ट - मानखुर्द आणि अणुशक्ती नगर 

    ठाणे
    २३ ऑगस्ट - एरोली आणि मुंब्रा कळवा
    २४ ऑगस्ट - भिवंडी पूर्व आणि शाहापूर

    नागपूर
    २५ ऑगस्ट - नागपूर पश्चिम, काटोल, सावनेर आणि रामटेक

    २६ ऑगस्ट - भंडारा, तुमसर

    २७ ऑगस्ट आणि २८ ऑगस्ट 
    मुंबई त इतर कामे

    २९ ऑगस्ट  - गोंदिया आणि अर्जुनी मोरगाव 
    ३० ऑगस्ट - चंद्रपुरी - ब्रह्मपुरी
    ३१ ऑगस्ट - गडचिरोली - गडचिरोली आणि अहेरी

  • 11:20 AM • 07 Aug 2024

    Uddhav thackeray : विश्वजित कदम-विशाल पाटलांना ठाकरे भेटले, पण दिल्लीत

    लोकसभा निवडणुकीवेळी सांगली लोकसभा मतदारसंघावरून महाविकास आघाडीत प्रचंड घमासान झाल्याचे बघायला मिळाले. उद्धव ठाकरेंनी सांगली लोकसभा मतदारसंघातून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली होती. पण, काँग्रेसच्या विशाल पाटलांनी बंड केले. त्यांच्या बंडाला काँग्रेसचे नेते विश्वजित कदम यांनी ताकद दिली आणि ठाकरेंच्या उमेदवाराचा पराभव झाला.

    लोकसभेच्या या निकालानंतर पहिल्यांदाच विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील यांची उद्धव ठाकरे यांच्यासोबत भेट झाली. मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेऊन असे विशाल पाटील आणि विश्वजित कदम मुंबई Tak चावडीवर म्हणाले होते. पण, दोन्ही नेत्यांना ठाकरे दिल्लीत भेटले. 

    उद्धव ठाकरे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्ली दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते राजकीय गणित जुळवून आणताना दिसत असून, इंडिया आघाडीतील नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. 

  • 10:40 AM • 07 Aug 2024

    Maharashtra News live : विजय वडेट्टीवार महायुती सरकारवर संतापले

    पावसाळ्यात पोलीस भरती सुरू असल्याने वेगवेगळ्या जिल्ह्यातून इतर जिल्ह्यात भरतीसाठी जाणाऱ्या तरुण मुला-मुलींचे प्रचंड हाल होताहेत. मुंबईतील पोलीस भरतीसाठी बाहेरगावावरून तरुणी मुंबईत आल्या. मात्र, त्यांच्या निवासाची व्यवस्था नसल्याने त्यांना रस्त्याच्या कडेलाच बसावे लागले. याबद्दलचा व्हिडीओ पोस्ट करत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारला सुनावले.

    "मुंबईतील चर्चगेट भागातील हा व्हिडिओ आहे. मुंबईत पोलीस भरतीसाठी आलेल्या मुली यामध्ये दिसताय. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधुन मुंबई सारख्या मोठ्या शहरात आलेल्या मुलींसाठी एक रात्र राहायची व्यवस्था सरकार आणि पोलिस प्रशासन करू शकत नाही? "

    "पाऊस असताना या मुली झोपतील कुठे? त्यांच्या सुरक्षेचं काय? वॉशरूम व्यवस्थेचं काय ? बेजबाबदार नियोजन आहे! सरकारने तातडीने स्थितीची दखल घेऊन पोलीस भरतीसाठी मुंबईत येणाऱ्या मुलींना राहण्यासाठी हॉलची व्यवस्था करावी ही विनंती",  अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

     

follow whatsapp

ADVERTISEMENT