9 कोटींमधल्या 2 कोटी मतदारांची नावं SIR मध्ये कशी वगळली?
महाराष्ट्रातील SIR प्रक्रियेचा Enumeration टप्पा पूर्ण झाला असून, सुमारे 2.07 ते 2.08 कोटी मतदारांचे फॉर्म उपलब्ध न झाल्याने त्यांची नावे 24 ऑगस्टला प्रसिद्ध होणाऱ्या Draft Electoral Roll मध्ये दिसणार नाहीत, अशी स्थिती आहे. मात्र याचा अर्थ ही 2 कोटी नावे कायमची मतदार यादीतून काढली गेली, असा नाही.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
2 कोटी नागरिकांची नावं मतदार यादीतून वगळली
पुढं काय होणार?
Maharashtra Voter List SIR : महाराष्ट्रातील एसआयआर (Special Intensive Revision) प्रक्रियेची मुदत संपल्यानंतर मतदार याद्यांमधून तब्बल दोन कोटींपेक्षा जास्त मतदारांची नावे वगळण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. महाराष्ट्रात एसआयआर अंतर्गत नाव नोंदणी आणि गणती फॉर्म (Enumeration Form) भरून देण्याची अंतिम तारीख 17 ऑगस्ट 2026 होती.
या प्रक्रियेत राज्यातील एकूण 9.78 कोटी मतदारांपैकी निवडणूक आयोगाने आतापर्यंत 7.69 कोटी (78.64%) मतदारांची माहिती डिजिटल स्वरूपात अपडेट केली आहे, मात्र 2.7 कोटी (21.25%) मतदारांचे फॉर्म प्राप्त न झाल्यामुळे त्यांची नावे पहिल्या टप्प्यात मतदार यादीतून वगळली गेली आहेत. निवडणूक आयोगाने या वगळण्यात आलेल्या मतदारांना ASD (Absent, Shifted, Duplicate) आणि Dead या वर्गवारीत टाकले आहे. यामध्ये सुमारे 37.94 लाख मृत मतदार, 6.36 लाख पत्ता न सापडलेले मतदार आणि 71.98 लाख कायमस्वरूपी स्थलांतरित झालेले मतदार आहेत.
पुढं काय होणार?
विशेष म्हणजे ग्रामीण भागात ही प्रक्रिया 100% पूर्ण झाली असली तरी ठाणे, पुणे, मुंबई आणि मुंबई उपनगर या चार जिल्ह्यांमध्ये बीएलओ द्वारे अर्ज गोळा करण्याचे काम मोठ्या प्रमाणावर अपूर्ण राहिले आहे, जिथे मुंबई उपनगरात 39.48%, ठाण्यात 38.77%, मुंबई शहरात 37.57% आणि पुण्यात 31.92% मतदारांचे अर्ज गोळा झालेले नाहीत.
दरम्यान, जर तुमचे नाव एसआयआरच्या पहिल्या यादीत नसेल, तर ते कायमचे रद्द झालेले नाही कारण निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार 24 ऑगस्ट 2026 ला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार असून, 24 ऑगस्ट ते 23 सप्टेंबर 2026 या कालावधीत नागरिकांना आपल्या हरकती व दुरुस्त्या नोंदवता येणार आहेत. यानंतर 27 ऑक्टोबर 2026 रोजी अंतिम मतदार यादी पब्लिश केली जाईल.
