Chhatrapati Sambhajinagar : दंग्यामागे राज्य सरकार; संजय राऊतांचा गंभीर आरोप
राज्यातील छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या घटनेबद्दल बोलताना खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर गंभीर आरोप केला आहे.
ADVERTISEMENT
छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या हिंसाचारामागे राज्य सरकार असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी केला आहे. राज्यात घडत असलेले दंगे सरकार पुरस्कृत असून, मुंबईतही हे असं करतील, असे विधान राऊत यांनी केले आहे. महाविकास आघाडीची 2 एप्रिल रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये सभा आयोजित करण्यात आलेली असून, त्या सभेमुळेच हे करण्यात आल्याचा दावाही राऊतांनी केला. ()
ADVERTISEMENT
संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. राज्यात छत्रपती संभाजीनगरसह काही ठिकाणी तणाव निर्माण करणाऱ्या घटना घडल्या. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, “काही ठिकाणी तो यशस्वी झाला आणि अनेक ठिकाणी दोन्ही धर्माचे लोकांनी सामंजस्याची भूमिका घेतली की, दंगल होऊ द्यायची नाही. पण संभाजीनगर 2 एप्रिलला महाविकास आघाडीची सभा आहे. ती सभा होऊ नये किंवा कायदा सुव्यवस्थेच्या नावाखाली त्या सभेला परवानगी मिळू नये. कायदा सुव्यवस्थेचे कारण द्यायचे की वातावरण तणावपूर्ण आहे, भडका उडू शकतो. हे कारण पुढे करून सभेला परवानगी नाकारायची, सभा होऊ द्यायची नाही. हे कारस्थान आहे”, असा दावा संजय राऊत यांनी केला.
हेही वाचा – मालवणीत संभाजीनगरची पुनरावृत्ती टळली! शोभायात्रेदरम्यान काय घडलं?
“काल मुंबईतील मालवणीमध्येही अशा प्रकारची चकमक झाली. यापूर्वी कधीही राम नवमीवर हल्ले झालेच नव्हते. यात्रा निघतात. महाराष्ट्रात गुढीपाडव्याचा यात्रा सगळ्यांनी काढल्या, पण खेड असेल, मालेगाव असेल, लोकांचा सभांना प्रतिसाद मिळतोय हे पाहिल्यावर काही लोकांच्या पायाखालची वाळू सरकली. त्यानंतर असे काही लोक हाताशी पकडून वातावरण बिघडवायचे आणि कारण नसताना जातीय, धार्मिक तेढ निर्माण करायची”, असा खळबळजनक आरोप राऊतांनी शिंदे फडणवीस सरकारवर केला.
हे वाचलं का?
Video – ‘मी आहे तोवर राममंदिराला काही होऊ देणार नाही’, किराडपुऱ्यातील घटनेनंतर जलील यांचं आवाहन
“सुप्रीम कोर्टाने काल सांगितले की, सरकार नपुंसक आहे. हा त्यांच्या नपुंसकतेचा पुरावाच आहे. या दंगली घडवणे, दंगलींना प्रोत्साहन देणे आणि ज्याने दंगली घडवल्या, त्यांच्यावर कारवाई न करणे”, असं संजय राऊत यावेळी म्हणाले.
संजय राऊत यांची देवेंद्र फडणवीसांवर टीका
“मूळात गृहमंत्र्यांचे (देवेंद्र फडणवीस) अस्तित्वच दिसत नाही. गृहमंत्र्यांचे अस्तित्व फक्त विरोधकांवर खोटे खटले दाखल करण्याचे आदेश देण्याइतपतच आहे. तेही सध्या मुख्यमंत्रीच देत आहेत. विरोधी पक्षाच्या प्रमुख लोकांवर खोट्या कारवाया करणे, खोटे खटले करणे, जुन्या प्रकरणांना उकरून नवीन खटले दाखल करणे”, असं म्हणत संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.
ADVERTISEMENT
“राज्यात असं कधी झालं नव्हते. पण, लक्षात ठेवा डाव उलटा पडला, तर उद्या आम्ही सत्तेवर येऊ, तेव्हा तुम्हाला याची सगळी उत्तरे द्यावी लागतील. खासकरून पोलिसांना”, असा इशारा खासदार संजय राऊत यांनी दिला.
ADVERTISEMENT
“हिंदू मुस्लीम करून हे राजकारण”, संजय राऊतांचा सरकारवर आरोप
राऊतांनी असा दावा केला की, “हे दंगे सरकार पुरस्कृत आहे. मुंबई होत आहे आणि आता हे लोक मुंबईतही करतील. कारण घाबरले आहेत. त्यामुळे हिंदू मुस्लीम करून हे राजकारण करत आहेत. पुर्ण देशात हे शांतता भंग करू इच्छित आहे. पूर्ण प्रयत्न करूनही जास्त काही करू शकले नाही”, असं राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT