कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह वादळ धडकणार! 'या' भागात कोसळणार पावसाच्या सरी

मुंबई तक

Maharashtra Weather Today :  भारतीय हवामान खात्याने (IMD) आणि इतर हवामान संस्थांनी 18 मे 2025 साठी महाराष्ट्रातील हवामानाचा अंदाज जाहीर केला आहे.

ADVERTISEMENT

उत्तर प्रदेश हवामान अपडेट
उत्तर प्रदेश हवामान अपडेट
social share
google news

बातम्या हायलाइट

point

राज्यात कोणत्या जिल्ह्यात वाहणार वादळी वारे?

point

या जिल्ह्यात कोसळणार पावसाच्या हलक्या सरी

point

आजच्या हवामानाबाबत वाचा सविस्तर माहिती

Maharashtra Weather Today :  भारतीय हवामान खात्याने (IMD) आणि इतर हवामान संस्थांनी 18 मे 2025 साठी महाराष्ट्रातील हवामानाचा अंदाज जाहीर केला आहे. आज महाराष्ट्रात मिश्र स्वरुपाचं हवामान असू शकतं. राज्याच्या काही भागांमध्ये ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी उष्ण आणि दमट वातावरण कायम राहू शकतं. 

कोकण आणि गोवा

कोकण पट्ट्यात, विशेषत: मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी येथे 18 मे रोजी आंशिक ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाच्या सरी कोसळू शकतात. दरम्यान, मुंबईत कमाल तापमान 33 ते 35 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 26 ते 28 अंश सेल्सिअस राहू शकतं. आर्द्रता 70 % पेक्षा जास्त असेल. ज्यामुळे या परिसरात उष्णतेच्या लाटा पसरतील.

काही ठिकाणी दुपारनंतर काही ठिकाणी दुपारनंतर किंवा संध्याकाळी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. रायगड आणि रत्नागिरीच्या किनारी भागात मध्यम पावसाची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग ताशी 30-40 किलोमीटर असू शकतो. मच्छीमारांना खोल समुद्रात न जाण्याचा सल्ला हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

हे ही वाचा >> बीडमधला नवा 'आका'.. तरुणाला जनावरासारखं मारणाऱ्या 7 गावगुंडांना पोलिसांनी उचललं!

पश्चिम महाराष्ट्र

पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात आज 18 मे 2025 रोजी ढगाळ वातावरण राहील. पुण्यात कमाल तापमान 34 ते 36 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 23 ते 25 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. या भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. विशेषत: दुपारनंतर. सातारा आणि कोल्हापूरमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने या भागात ताशी 50-60 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज वर्तवला आहे. 

मराठवाडा

मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी आणि बीड यांसारख्या जिल्ह्यांमध्ये 18 मे रोजी हवामान मुख्यत: ढगाळ राहील, आणि तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. कमाल तापमान 36 ते 38 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 24 ते 26 अंश सेल्सिअस राहील. या भागात आर्द्रता मध्यम असेल, परंतु काही ठिकाणी उष्णता वाढल्याने नागरिकांना त्रास जाणवू शकतो. 

हे ही वाचा >> Indian Army मध्ये बंपर भरती, कोणतीही परीक्षा नाही थेट Interview! पगार तब्बल...

विदर्भ

नागपूर, अमरावती, वर्धा आणि चंद्रपूरसह विदर्भात हवामान उष्ण आणि दमट राहील. कमाल तापमान 38 ते 40 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 25 ते 27 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी आंशिक ढगाळ वातावरण असेल, परंतु पावसाची शक्यता कमी आहे. हवामान खात्याने या भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला नाही. 

मान्सूनपूर्व पावसाची शक्यता

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात 18 मे रोजी पडणारा पाऊस हा मान्सूनपूर्व (प्री-मान्सून) पावसाचा भाग आहे. अरबी समुद्रावरील चक्रीवादळामुळे (Anticyclone) कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता वाढली आहे. यंदा मान्सून 18 ते 19 मेपर्यंत केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे, आणि त्यानंतर 5 ते 6 जूनपर्यंत महाराष्ट्रात मान्सून प्रवेश करेल.

हे वाचलं का?

    follow whatsapp