Maharashtra Weather : राज्यात पावसाचा विलंब, 'या' जिल्ह्यांत उष्णतेचा व्हेव्ह; काही जिल्ह्यांना यलो अलर्ट
Maharashtra Weather : 16 जूनसाठी विविध भागांत उष्ण आणि पावसाचा सतर्कतेचा इशारा वर्तवण्यात आला आहे. राज्यातील 17 जिल्ह्यांना उष्णतेचा अलर्ट वर्तवण्यात आला आहे. अशातच जाणून घेऊयात 16 जून 2026 रोजी राज्यातील हवामानाचा अंदाज.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
राज्यातील हवामानात मोठ्या प्रमाणात बदल
16 जूनसाठी विविध भागांत उष्ण आणि पावसाचा सतर्कतेचा इशारा
Maharashtra Weather : राज्यातील हवामानात मोठ्या प्रमाणात बदल होताना दिसतो. 16 जूनसाठी विविध भागांत उष्ण आणि पावसाचा सतर्कतेचा इशारा वर्तवण्यात आला आहे. राज्यातील 17 जिल्ह्यांना उष्णतेचा अलर्ट वर्तवण्यात आला आहे. अशातच जाणून घेऊयात 16 जून 2026 रोजी राज्यातील हवामानाचा अंदाज.
हे ही वाचा : पुणे : आकुर्डीत डॉक्टरकडून महिला रुग्णाचा विनयभंग, महिला ओरडू लागली..
कोकण
कोकण विभागात पालघर, ठाणे आणि मुंबई या तीन जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट वर्तवण्यात आला आहे. दुसरीकडे रायगड आणि रत्नागिरीत मेघगर्जनेसह पावसाची अधिक शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकणातील काही ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान आणि काही ठिकाणी पावसाच्या सरींचा अनुभव येणार आहे.
उत्तर महाराष्ट्र
उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदूरबार, जळगाव आणि नाशिक या चार जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट वर्तवण्यात आला. दुपारी तापमानात वाढ होण्याची अधिक शक्यता आहे. नाशिक जिल्ह्यातील घाटमाथा परिसरात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्र
पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांत उष्णतेचा यलो अलर्ट वर्तवण्यात आला आहे. तर पुणे आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्टचा अंदाज व्यक्त करण्यात आला. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यात अलर्ट नसला तरीही काही भागांत हलक्या पावसाची शक्यता आहे.









