Maharashtra Weather : गणेशोत्सवाच्या तोंडावर पाऊस झाला गायब? IMD चा महत्त्वाचा अंदाज

मुंबई तक

Maharashtra Weather : राज्यात सध्या संथपणे पावसाच्या धारा कोसळत आहेत. अशातच जाणून घ्या 9 सप्टेंबर 2026 रोजी राज्यातील एकूण हवामानाचा अंदाज पुढीलप्रमाणे नमूद करण्यात आला आहे. 

ADVERTISEMENT

mumbai monsoon update 2026 monsoon finally arrives where are rain warnings issued imd alert for maharashtra 24 june 2026 weather
प्रातिनिधीक फोटो
Google CTA

बातम्या हायलाइट

point

राज्यात संथपणे पावसाच्या धारा

point

9 सप्टेंबर 2026 रोजी राज्यातील एकूण हवामानाचा अंदाज पुढीलप्रमाणे..

Maharashtra Weather : राज्यात सध्या संथपणे पावसाच्या धारा कोसळत आहेत. काही ठिकाणी हलका ते मध्यम तर कुठे मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर काही भागांत हलक्या स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. अशातच जाणून घ्या 9 सप्टेंबर 2026 रोजी राज्यातील एकूण हवामानाचा अंदाज पुढीलप्रमाणे नमूद करण्यात आला आहे. 

हे ही वाचा : शिवेंद्रसिंह राजे यांचा 'तो' फोटो व्हायरल, सोशल मीडियावर पोस्ट करत पहिली प्रतिक्रिया

कोकण 

कोकणात पालघर, मुंबई आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत हलक्या पावसाची शक्यता आहे. ठाणे, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात येते. 

उत्तर महाराष्ट्र 

उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार येथे विजांसह हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली. जळगाव, नाशिक, अहिल्यानगर येथे हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. नाशिक घाटमाथा परिसरात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज राहण्याची शक्यता आहे. 

पश्चिम महाराष्ट्र 

पश्चिम महाराष्ट्रात पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर घाटमाथा येथे हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. सोलापूरमध्ये कोरडं हवामान राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे, तर पुणे घाटमाथा आणि सातारा घाटमाथा परिसरात विजांसह मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे.