Maharashtra Weather : राज्यात पावसाचा लपंडाव, 'या' ठिकाणी हलका ते मध्यम; IMD अलर्ट

मुंबई तक

Maharashtra Weather : राज्यात सध्या पावसाची सामान्य स्थिती आहे. काही ठिकाणी हवामान कोरडं राहण्याची अधिकची शक्यता आहे. अशातच जाणून घेऊयात 17 सप्टेंबर 2026 रोजी राज्यातील एकूण हवामानाचा अंदाज पुढीलप्रमाणे नमूद करण्यात आलाय. 

ADVERTISEMENT

maharashtra weather rainfall (AI Photo)
maharashtra weather rainfall (AI Photo)
Google CTA

बातम्या हायलाइट

point

राज्यात काही ठिकाणी हवामान कोरडं राहण्याची स्थिती

point

जाणून घेऊयात 17 सप्टेंबर 2026 रोजी राज्यातील एकूण हवामानाचा अंदाज.

Maharashtra Weather : राज्यात सध्या पावसाची सामान्य स्थिती आहे. काही ठिकाणी हवामान कोरडं राहण्याची अधिकची शक्यता आहे. अशातच काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे, तर कुठे हलक्या स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. अशातच जाणून घेऊयात 17 सप्टेंबर 2026 रोजी राज्यातील एकूण हवामानाचा अंदाज पुढीलप्रमाणे नमूद करण्यात आलाय. 

हे ही वाचा : ".. तर हे सरकार पडू शकतं", प्रकृती चिंताजनक तरीही जरांगे फायर

कोकण 

कोकणातील पालघर, मुंबई, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत हलक्या स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तविण्यात आल्याची शक्यता आहे. तर ठाणे आणि रायगड जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. 

उत्तर महाराष्ट्र 

उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नाशिक आणि नंदुरबार येथे हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे. नाशिक घाटमाथा येथे हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. अहिल्यानगर जिल्ह्याला विजांसह हलक्या पावसाची शक्यता आहे. 

पश्चिम महाराष्ट्र 

पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत विजांसह हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर घाटमाथा, सातारा घाटमाथा आणि कोल्हापूर जिल्ह्यांत हलक्या स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. पुणे घाटमाथा परिसरात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात येत आहे.