Maharashtra Weather : पावसाचा पुन्हा ब्रेक, पुन्हा एकदा राज्यावर संकट? IMD अपडेट

मुंबई तक

Maharashtra Weather : राज्यात पावसाचा वेग सध्या मंदावला आहे, कुठे हलका ते मध्यम तर कुठे मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. अशातच 5 सप्टेंबर 2026 रोजी राज्यातील एकूण हवामान विभागाचा अंदाज जाणून घ्या.

ADVERTISEMENT

Maharashtra Weather (AI Photo)
Maharashtra Weather
Google CTA

बातम्या हायलाइट

point

राज्यात पावसाचा वेग मंदावला

point

5 सप्टेंबर 2026 रोजी राज्यातील एकूण हवामान विभागाचा अंदाज जाणून घ्या

Maharashtra Weather : राज्यात पावसाचा वेग सध्या मंदावला आहे, कुठे हलका ते मध्यम तर कुठे मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तर काही भागांत हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात येते. 5 सप्टेंबर रोजी कोकणात काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. अशातच जाणून घ्या 5 सप्टेंबर 2026 रोजी राज्यातील एकूण हवामान विभागाचा अंदाज. 

हे ही वाचा : Exclusive: पुणेच नाही अवघ्या देशभर चर्चा असलेल्या बिनधास्त बापटांची स्फोटक मुलाखत

कोकण 

कोकण पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तविलेला आहे. 

उत्तर महाराष्ट्र 

उत्तर महाराष्ट्रात धुळे आणि नाशिक या दोन जिल्ह्यांत विजांसह हलक्या पावसाची शक्यता आहे. जळगाव, अहिल्यानगर आणि नंदुरबार येथे हलक्या स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. 

पश्चिम महाराष्ट्र 

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूरमध्ये हलक्या स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तविण्यात आलाय.  सातारा, घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा आणि पुणे घाटमाथा परिसरात मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.