Exclusive: पुणेच नाही अवघ्या देशभर चर्चा असलेल्या बिनधास्त बापटांची स्फोटक मुलाखत

मुंबई तक

Vidyanand Bapat Interview: गणेशोत्सव डीजेमुक्त करण्याची भूमिका, हल्ल्यानंतरची प्रतिक्रिया, ढोल-ताशांवरील मत, ध्वनीप्रदूषण आणि पुढील आंदोलनाची दिशा यावर विद्यानंद बापट यांनी मुंबई Tak ला दिलेली सविस्तर Exclusive मुलाखत.

ADVERTISEMENT

exclusive vidyanand bapat interview dj free ganeshotsav noise pollution mumbai tak
Vidyanand Bapat Interview
Google CTA

पुणे: गणेशोत्सव डीजेमुक्त असावा, ध्वनीप्रदूषणावर कठोर नियंत्रण आणावे आणि सण उत्सव कालसुसंगत पद्धतीने साजरे व्हावेत, अशी भूमिका मांडल्यानंतर पुण्यातील विद्यानंद बापट हे महाराष्ट्रभर चर्चेत आले आहेत. त्यांच्या भूमिकेला मोठ्या प्रमाणावर समर्थन मिळत असतानाच त्यांच्यावर हल्लाही झाला. त्यानंतर त्यांना पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुंबई Tak ने विद्यानंद बापट यांच्याशी सविस्तर संवाद साधला. त्यांच्या भूमिकेमागील विचार, आंदोलनाची दिशा आणि टीकाकारांना दिलेली उत्तरे जाणून घेऊया.

विद्यानंद बापट यांची Exclusive मुलाखत, जशीच्या तशी..

प्रश्न: सर्वप्रथम मुंबई Tak मध्ये तुमचं स्वागत. काल तुमच्यावर हल्ला झाला. त्यानंतरही तुम्ही तुमच्या भूमिकेवर ठाम आहात का? आणि पुढे ही चळवळ कशी नेणार आहात?

विद्यानंद बापट: हो, मी पूर्णपणे ठाम आहे. कारण मी जे मुद्दे मांडले आहेत, त्यावर आजपर्यंत कुणीही तार्किक प्रतिवाद केलेला नाही. गेल्या सोमवारी महापालिकेत झालेल्या बैठकीनंतर या मागणीला संघटित स्वरूप मिळू लागले आहे. विविध स्तरांवर अनेक नागरिक एकत्र येत आहेत. सध्या मी अनेक माध्यमांना मुलाखती देण्यात व्यस्त आहे. मात्र, लवकरच या चळवळीची ठोस रूपरेषा जाहीर करू.

प्रश्न: कालचा हल्ला, त्यानंतरच्या प्रतिक्रिया आणि तुमच्या आई-वडिलांनी व्यक्त केलेली चिंता... या सगळ्याकडे तुम्ही कसे पाहता?