Maharashtra Weather: कुठे उकाडा तर कुठे मुसळधार! आज तुमच्या शहरात पावसाचा अंदाज काय?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

आज तुमच्या शहरात कसा असणार पावसाचा अंदाज?

point

मुंबईकर उकाड्याने हैराण कशी असणार पावसाची स्थिती?

point

राज्यातील 'या' जिल्ह्यांत पावसाचा अंदाज

Maharashtra Weather News : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक ठिकाणी पावसाने विश्रांती घेतल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे नागरिक उकाड्याने त्रस्त झाले आहेत. पण, पुण्यात मात्र रविवारी (18 ऑगस्ट) पावसाने जोरदार बॅटिंग केली. रस्ते अगदी जलमय झाल्याचे दिसले. अशातच राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आता हवामान विभागाने वर्तवली आहे. आजचा (19 ऑगस्ट) महाराष्ट्रातील हवामान विभागाचा अंदाज जाणून घेऊयात. (maharashtra Weather live news update today 19 august 2024 know the details of weather Mumbai pune and these district)

ADVERTISEMENT

राज्यातील दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात अती मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हेही वाचा : Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी खूशखबर! शिंदे सरकार महिलांना देणार आणखी एक गिफ्ट

मुंबईकर उकाड्याने हैराण कशी असणार पावसाची स्थिती?

पुढील २४ तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांसाठी स्थानिक अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. शहर आणि उपनगरात अंशतः ढगाळ वातावरण आणि हलका ते मध्यम पाऊस/ मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची  शक्यता आहे. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 34°C आणि 26°C च्या आसपास असेल.

हे वाचलं का?

राज्यातील 'या' जिल्ह्यांत पावसाचा अंदाज

कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास वेग) आणि हलका ते  मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, बीड, बुलढाणा, वाशीम, यवतमाळ, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर जास्त राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

ADVERTISEMENT

हेही वाचा : Satara Accident : रक्षाबंधनासाठी निघालेल्या भावावर काळाचा घाला, रस्ते अपघातात झाला दुदैवी मृत्यू

गेल्या काही दिवसांपासून पावसाने दांडी मारल्याने उष्णता मोठ्या प्रमाणात वाढली होती. त्यामुळे नागरिक ऐन पावसाळ्यात उकाड्याने त्रस्त झाले आहेत. आता पुन्हा पाऊस सक्रीय होत असल्याने उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळू शकेल.

ADVERTISEMENT


 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT