लाइव्ह

Mumbai Rain Update Live : मुसळधार पावसामुळे इमारतीचा भाग कोसळला

मुंबई तक

ADVERTISEMENT

मुंबईत बहुमजली इमारतीचा काही भाग जमीनदोस्त
मुंबईत बहुमजली इमारतीचा काही भाग कोसळल्याची घटना घडली.
social share
google news

Maharashtra Weather Updates Live : मुंबई शहर, मुंबई उपनगरांमध्ये शनिवारी (20 जुलै) मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्यातसह विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांतही पावसाचा जोर वाढणार असून, हवामान विभागाने काही जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट, तर काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज् अलर्ट जारी केला आहे. (IMD predicts Heavy to Very Heavy Rainfall in many districts of maharashtra including Mumbai, Thane, Chandrapur, nagpur)

ADVERTISEMENT

मुंबई शहर आणि मुंबई उपनगरांमध्ये गेल्या 24 तासांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. पुढील काही तास पावसाचा जोर कायम राहणार आहे. काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. महाराष्ट्रातील हवामानाच्या बातम्यासह इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल वाचा लाईव्ह अपडेट्समध्ये...

 

ADVERTISEMENT

  • 07:15 PM • 20 Jul 2024

    Nagpur Rain Video : नागपूरमध्ये अतिवृष्टी, पावसाची भयावह दृष्टी

    महाराष्ट्राची उप राजधानी नागपूरला पावसाने झोडपून काढले. नागपूर शहर आणि जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. त्यामुळे शहरातील अनेक भागात पाणीच पाणी साचले होते. 

     

  • 05:40 PM • 20 Jul 2024

    Maharashtra Rains Live : 6 तास बाप-लेक होते पुराच्या पाण्यात

    पुराच्या पाण्यात अडकलेल्या बाप-लेकांना सुखरूप बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले. 

    गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील पिपरी येथील चुलबंद नदी दुथळी भरून वाहत असताना पिपरी येथील शेतकरी रवींद्र पुंडे व त्यांचा मुलगा अजय पुंडे हे दोघेही बापलेक सकाळच्या सुमारास शेतात गेले होते.

    दरम्यान अचानक पुराच्या पाण्याने शेताला वेढा घातला. त्यामुळे बापलेक पाण्यात अडकले होते. 6 तासानंतर बचाव पथकाने त्यांना सुखरुप बाहेर काढले. 

    Maharashtra Rains Live updates
    पुराच्या पाण्यात अडकलेल्या बापलेकाला सुखरुप घेऊन येताना बचाव पथकाचे जवान.
  • 12:48 PM • 20 Jul 2024

    Mumbai Rain Update Live : मुसळधार पावसामुळे इमारतीचा भाग कोसळला

    मुंबईतील ग्रँट रोड रेल्वे स्थानकाजवळील रुबिनिस्सा मंजिल इमारतीच्या दुसऱ्या, तिसऱ्या, आणि चौथ्या मजल्यावरील बाल्कनीचा भाग कोसळला. तर काही भाग लटला. 

    मुसळधार पावसामुळे ही घटना घडली. यात चार ते पाच जण जखमी झाल्याची माहिती आहे. अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान प्रयत्न करत आहेत. 

     

  • 11:07 AM • 20 Jul 2024

    Mumbai Weather Live Updates : पुढील  3-4 तासांत अतिमुसळधार पाऊस

    मुंबई, ठाणे जिल्ह्यासह कोकणात पुढील 3-4 तासांत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

     

  • ADVERTISEMENT

  • 10:13 AM • 20 Jul 2024

    Maharashtra Weather Forecast : महाराष्ट्रात कुठे कसा असेल पाऊस?

    हवामान विभागाच्या अंदाजानुसार कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग आणि विदर्भ व मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत पावसाचा जोर वाढेल.

    20 जुलै रोजीसाठी हवामान विभागाने ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, सातारा, अमरावती, वर्धा नागपूर, नांदेड, गडचिरोली या जिल्ह्यांत अतिमुसळधार पवासाचा अंदाज वर्तवला आहे.

    रत्नागिरी आणि चंद्रपूर जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याचा इशारा दिला आहे. या दोन्ही जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. नागपूर जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने सर्व शाळा, महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 

    mumbai weather forecast, Maharashtra weather forecast Map
    मुंबईसह महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांत 20 जुलै 2024 रोजी कसा असेल पाऊस?
follow whatsapp

ADVERTISEMENT