Maharashtra Weather : राज्यात कोरडं हवामान, 'या' जिल्ह्यांत उष्णतेची लाट
Maharashtra weather : राज्यात सध्या हवामान कोरडं राहणार असून काही ठिकाणी हलक्या स्वरुपाचा वादळी पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. 7 ऑक्टोबर 2026 रोजी राज्यातील एकूण हवामानाचा अंदाज पुढीलप्रमाणे..
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
राज्यात सध्या हवामान कोरडं
7 ऑक्टोबर 2026 रोजी राज्यातील एकूण हवामानाचा अंदाज पुढीलप्रमाणे..
Maharashtra Weather : राज्यात सध्या हवामान कोरडं राहणार असून काही ठिकाणी हलक्या स्वरुपाचा वादळी पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. तर काही भागांत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळे, हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. अशातच जाणून घेऊयात 7 ऑक्टोबर 2026 रोजी राज्यातील एकूण हवामान विभागाची शक्यता पुढीलप्रमाणे नमूद करण्यात आली.
हे ही वाचा : सांगलीत अनैतिक संबंधातून 52 वर्षीय व्यक्तीची हत्या, हृदयविकाराचा बनाव रचत काढला काटा
कोकण
कोकण विभागात पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरीत कोरड्या हवामानाचा अंदाज वर्तविलेला आहे, तर सिंधुदुर्गात विजांच्या कडकडाटासह वादळे, हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे.
उत्तर महाराष्ट्र
उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नाशिक घाटमाथा आणि अहिल्यानगर येथे कोरड्या हवामानाची शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्र
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, पुणे घाटमाथा, सातारा, सातारा घाटमाथा, सांगली आणि सोलापूर येथे कोरड्या हवामानाची शक्यता आहे. कोल्हापूर, कोल्हापूर घाटमाथा परिसरात विजांच्या कडकडाटासह वादळे, हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तविली आहे.
