सांगलीत अनैतिक संबंधातून 52 वर्षीय व्यक्तीची हत्या, हृदयविकाराचा बनाव रचत काढला काटा
Sangli crime news : सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील डफळपूरा येथे मन सुन्न करून टाकणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. अनैतिक प्रेमसंबंधातून पत्नीने आपल्या नवऱ्याला हृदयविकाराचा झटका आल्याचा बनाव रचून संपवलं.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पत्नी सुनिता चव्हाणचे गंगाधर रामू तेलीसोबत बरीच वर्षे प्रेम संबंध
पाच आरोपींच्या आवळल्या मुसक्या
Sangli Crime News : स्वाती चिखलीकर - सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील डफळपूरा येथे मन सुन्न करून टाकणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. अनैतिक प्रेमसंबंधातून अप्पासो लक्ष्मण चव्हाण (वय 52) यांची निर्घृणपणे हत्या केल्याची घटना आहे. पत्नीने हृदयविकाराचा झटका आल्याचा बनाव करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला होता, मात्र हे प्रकरण तब्बल दिड महिन्यानंतर उघडकीस आले आहे. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध खून आणि पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास उलगडल्यानंतर डफळपूरा हादरून गेले आहे.
हे ही वाचा : इयत्ता दहावीच्या विद्यार्थीनीचे अपहरण, गुंगीचे इंजेक्शन देत केला लैंगिक अत्याचार
पत्नी सुनिता चव्हाणचे गंगाधर रामू तेलीसोबत बरीच वर्षे प्रेम संबंध
पोलिसांच्या माहितीनुसार, मृत व्यक्ती अप्पासो चव्हाण यांच्या पत्नी सुनिता चव्हाण हिचे गंगाधर रामू तेलीसोबत बरीच वर्षे प्रेम संबंध होते, असे तपासातून उघडकीस आले. या संबंधित घटनेची माहिती अप्पासो यांना समजल्यानंतर पती-पत्नीत वाद उफळला होता. दि. 22 ऑगस्टच्या रात्री आप्पासो यांना जेवणातून गुंगीचे औषध दिल्यानंतर घराचा दरवाजा उघडून गंगाधर तेली, विक्रांत चव्हाण आणि प्रतिक मोकाशी यांना आत बोलावण्यात आल्याचा आरोप आहे.
हात पाय बांधून गळा आवळून आप्पासोची हत्या
त्यानंतर आप्पासो यांचे हात-पाय पकडून उशिने तोंड दाबून आणि गळा आवळून त्यांची हत्या करण्यात आला होता. त्यानंतर आप्पासो यांना हृदयविकाराचा झटका आल्याचा बनाव करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला, त्यांना रुग्णालयात नेण्यात केले असता, उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले होते. अंत्यसंस्कार करताना कपडे, अंथरूण आणि उशी जाळून टाकून पुरावे नष्ट करण्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.
हे ही वाचा : नवऱ्याने शेजारी राहणाऱ्या व्यक्तीच्या मोबाईलमध्ये पाहिला बायकोचा व्हिडिओ, प्रियकराच्या मदतीने पतीचा काढला काटा
पाच आरोपींच्या आवळल्या मुसक्या
या प्रकरणात सुनिता आप्पासो चव्हाण, गंगाधर रामू तेली, विक्रांत सर्जेराव चव्हाण, प्रतिक लक्ष्मण मोकाशी, आप्पासो चव्हाण आणि एका अल्पवयीन मुलीचा समावेश आहे. दरम्यान, दि. 1 ऑक्टोबर रोजी संशयितांची चौकशी सुरू असल्याची माहिती समोर आल्यानंतर सुनिताने गुन्ह्याची कबुली दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेनं आता जत तालुक्यात एकच खळबळ उडाल्याचे वृत्त आहे. पत्नी सुनिता आप्पासो चव्हाण, तिचा प्रियकर गंगाधर रामू तेली, तसेच विक्रांत सर्जेराव चव्हाण, प्रतीक लक्ष्मण मोकाशी आणि मयताची मुलगी यांच्याविरुद्ध खून व पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींना 12 ऑक्टोबर रोजी पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाचा पोलीस निरीक्षक विजय घेरडे तपास करत आहेत.
