Mahrashtra Weather : शनिवारी दुहेरी संकट, काही ठिकाणी दिवसा उष्णता अन् रात्री गारवा

Mahrashtra Weather : नोव्हेंबर महिन्याच्या मध्यात आता काही अंशी प्रमाणात रात्री गारवा जाणवेल, मात्र दिवसा उष्णता कायम राहण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागने जारी केलेला अंदाज पुढीलप्रमाणे नमूद केला आहे. 

ADVERTISEMENT

Maharashtra Weather
Maharashtra Weather
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

राज्यातील वातावरणात सातत्याने बदल

point

नोव्हेंबर महिन्याच्या मध्यात रात्री गारवा जाणवेल

Mahrashtra Weather : राज्यातील वातावरण आता सातत्याने बदलताना दिसत आहे. अशातच आता पावसाचा अंदाज पूर्णपणे नसणार. नोव्हेंबर महिन्याच्या मध्यात आता काही अंशी प्रमाणात रात्री गारवा जाणवेल, मात्र दिवसा उष्णता कायम राहण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागने जारी केलेला अंदाज पुढीलप्रमाणे नमूद केला आहे. 

हे ही वाचा : 'भाजपच्या सापळ्यात अडकू नका, योग्य वेळी निर्णय घेऊ..' छठ पुजेवरुन राज ठाकरे आक्रमक

कोकण 

कोकणात मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत 14 नोव्हेंबर रोजी हवामान हे प्रामुख्याने कोरडे आणि निरभ्र राहणार आहे. मुंबई येथे दुपारी सागरी वाऱ्याचे आगमन उशिराने होणार असल्याने किनाऱ्यालगत भागात उकाडा जाणवण्याची शक्यता आहे.  तर उत्तर आणि ईशान्येकडील वाऱ्यांमुळे रात्री गारवा जाणवेल. 

पश्चिम महाराष्ट्र 

पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांत हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे. पुणे शहरातील ईशान्येच्या भागाकडून वारे वाहत आहेत. महाबळेश्वर, कोल्हापूर येथे 14 नोव्हेंबर रोजी रात्री तापमानात घट होऊन थंडीचा प्रभाव किंचितसा वाढेल. 

उत्तर महाराष्ट्र 

उत्तर महाराष्ट्रात नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत रात्री गारवा जाणवण्याची शक्यता आहे. मालेगाव येथे  सर्वाधिक कमी तापमान आहे. अहिल्यानगर येथे काही प्रमाणात तापमानात वाढ झाल्याचा अंदाज आहे. 

मराठवाडा 

मराठवाडा विभागात छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, नांदेड आणि धाराशिव जिल्ह्यांत हवामान स्वच्छ आणि कोरडे राहील. तर नांदेड आणि परभणी जिल्ह्यांत दिवसा शुष्क हवामान अनुभवण्यास मिळेल. त्याचप्रमाणे रात्री तापमानात घट होण्यास सुरुवात होईल. 

हे ही वाचा : आळंदी हादरली! तीर्थक्षेत्र परिसरात तरुणावर दिवसाढवळ्या तिघांकडून वार

विदर्भ 

विदर्भातनागपूर, अमरावती, अकोला, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ आणि गडचिरोली जिल्ह्यांत पावसाच्या परताव्यानंतर आता कोरडं हवामान आहे. काही जिल्ह्यांमध्ये सौम्य उकाडा राहण्याची शक्यता आहे. तसेच काही भागात थंडावा देखील जाणवेल.