आळंदी हादरली! तीर्थक्षेत्र परिसरात तरुणावर दिवसाढवळ्या तिघांकडून वार

Pune Crime News : पुण्यातील आळंदी तीर्थक्षेत्राच्या आळंदी नगर परिषदेच्या परिसरात धक्कादायक प्रकार उघडकीस आला. एका तरुणावर भरदिवसा सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास एका तरुणावर तीन हल्लेखोरांनी सपासप वार केले. दिवसाढवळ्या या घडलेल्या घटनेनं संपूर्ण परिसर हादरून गेल्याचे वृत्त समोर आले.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

आळंदी नगर परिषदेच्या परिसरात धक्कादायक प्रकार

point

तिघांनी तरुणावर केले वार

Pune Crime News : पुण्यातील आळंदी तीर्थक्षेत्राच्या आळंदी नगर परिषदेच्या परिसरात धक्कादायक प्रकार उघडकीस आला. एका तरुणावर भरदिवसा सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास एका तरुणावर तीन हल्लेखोरांनी सपासप वार केले. दिवसाढवळ्या या घडलेल्या घटनेनं संपूर्ण परिसर हादरून गेल्याचे वृत्त समोर आले. तसेच परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. ज्या तरुणावर हल्ला केला त्याची सागर बडे अशी ओळख समोर आली. 

हे ही वाचा : 12 वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचे महिलेशी प्रेमसंबंध, तरुणाची केली हत्या अन्..

सीसीटीव्हीत घटनेचा थरार

संबंधित घटनेचा थरार व्हिडिओत कैद झाल्याची माहिती आहे. ज्यात काही तरुण एकाचा पाठलाग करत कोयत्याने हल्ला करताना दिसत आहेत. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असता, त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अशातच पोलीसच पुढील प्रकरणाची कार्यवाही करत आहेत. ही दुर्दैवी घटना 11 नोव्हेंबर 2026 रोजी शुक्रवारी सकाळी साडेदाहा वाजता घडली.  

तरूणावर धारदार शस्त्राने हल्ला

घडलेल्या घटनेनुसार, सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास आळंदी नगर परिषद परिसरात तरूणावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला होता.भरदिवसा घडलेल्या या घटनेचा थरार पाहून स्थानिक नागरिकांमध्ये मोठी घबराट पसरली होती.

हे ही वाचा : नवऱ्यानं बायकोला संपवलं, मुलींना म्हणाला; 'आपण दुसरी आई आणू अन्..'

आळंदीला आध्यात्माचा आणि संतांचा वसा लाभलेला आहे. याच आळंदीत आता अशा गुन्हेगारीच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. दरम्यान, या हल्ल्यामागील नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन प्रकरणाचा तपास केला, तसेच आरोपींचा शोध घेतला जातोय.