नवऱ्यानं बायकोला संपवलं, मुलींना म्हणाला; 'आपण दुसरी आई आणू अन्..'

crime news : नवऱ्याने बायकोची हत्या करून तो आपल्या दोन मुलींसोबत पोलीस ठाण्यात गेला आणि स्वत:ला सरेंडर केलं.

ADVERTISEMENT

crime news
crime news
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

नवऱ्याने बायकोची केली हत्या

point

मुलींसह आरोपी पोलीस ठाण्यात सरेंडर

Crime News : नवऱ्याने बायकोची हत्या करून तो आपल्या दोन मुलींसोबत पोलीस ठाण्यात गेला आणि स्वत:ला सरेंडर केलं. आरोपीची ओळख रेल्वेचे निवृत्त कर्मचारी दशरथ मंडल अशी ओळख समोर आली. त्याच्यावर पत्नी पूजा देवीची हत्या केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता. ही घटना बिहारच्या मुंगेर जिल्ह्यातील जमलापुरमध्ये पत्नीची हत्या केल्याचा आरोप आहे. 

हे ही वाचा : Astrology : आज 'या' राशीतील लोकांचा खर्च वाढेल, जाणून घ्या 12 राशींचे भविष्य

पतीनं पत्नीला चाकूने भोसकलं

या घटनेची प्रत्यक्षदर्शी असलेल्या श्रीनिका (वय 10) यांनी सांगितलेल्या घटनेनं मोठा धक्का बसला. मुलीने वडिलांना कठोर शिक्षेची मागणी केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. या प्रकरणाची माहिती मुलीने सांगितली की, वडिलांनीच आईला बांधून मारहाण केली आणि नंतर चाकूने भोसकले होते. 

श्रीनिकाच्या म्हणण्यानुसार, ती रात्री तिची धाकटी बहीण इशिकासोबत झोपली होती. तिच्या वडिलांनी तिच्या आईला अंथरुणातून औढून बाहेर काढेल, तिला स्कार्फने बांधले आणि नंतर दोनदा चाकूने हल्ला केल्याची घटना आहे. आईच्या किंकाळ्या ऐकून श्रीनिका जागी झाली होती. तिने पाहिलं की, तिची आई जमिनीवर निशब्द पडून होती. ती शेजाऱ्याला बोलावणार होती, मात्र तिच्या वडिलांनी तिला थांबवले. 

"तुझी आई गेली, आपण दुसरी आई आणू"

तेव्हा तिचे वडील म्हणाले, "तुझी आई वारली आहे, आम्ही तुझ्यासाठी नवीन आई आणू." यावर श्रीनिका म्हणाली, "आई ही आईच असते. तिची जागा कोणीही घेऊ शकत नाही." या घटनेनंतर श्रीनिकाचे वडील हे दोन मुलींसोबत पोलीस ठाण्यात गेले आणि सरेंडर झाले. आईच्या निधनानंतर श्रीनिकाने वडिलांना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. मृताचे माहेरचे कुटुंबीय या घटनेमुळे शोकाकुल आणि संतप्त आहेत.

हे ही वाचा : 'भाजपच्या सापळ्यात अडकू नका, योग्य वेळी निर्णय घेऊ..' छठ पुजेवरुन राज ठाकरे आक्रमक

अशातच पोलिसांनी आरोपीला अटक केली असून काही हत्यारे जमा केलीत. एफएसएलच्या पथकाने घटनास्थळावरून पुरावे गोळा केले आहेत. गुन्ह्यात वापरलेला चाकू जप्त करण्यात आला. नंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला, या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई केली आहे.