मुंबईची खबर : बेस्टच्या ताफ्यात दाखल होणार 1500 इलेक्ट्रिक बस, 'या' मार्गावरील प्रवाशांना लाभ

मुंबईकरांना दिलासा देणारी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. लवकरच बेस्टच्या ताफ्यात 1500 AC इलेक्ट्रिक बस दाखल होणार आहेत.

ADVERTISEMENT

Mumbai News
Mumbai News
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

बेस्टच्या ताफ्यात नव्या 1500 बस

point

कोणत्या भागातील प्रवाशांना फायदा?

Mumbai News : मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मुंबईकरांचा प्रवास अधिक सुखकर आणि पर्यावरणपूरक करण्यासाठी 'बेस्ट'ने (BEST) एक मोठे पाऊल उचलले आहे. बेस्टने गुरुवारी (12 नोव्हेंबर) आपल्या ताफ्यात 1500 वातानुकूलित (AC) इलेक्ट्रिक बस समाविष्ट करण्याच्या करारावर स्वाक्षरी केली आहे. केंद्र सरकारच्या 'पीएम ई-ड्राईव्ह' (PM E-Drive) योजनेअंतर्गत या 9 मीटर लांबीच्या मिडी बस बेस्टच्या ताफ्यात दाखल होणार असून, यामुळे मुंबईच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला मोठी बळकटी मिळणार आहे.

बंद झालेले मार्ग पुन्हा सुरु

या नव्या बसगाड्यांच्या समावेशामुळे मुंबईतील गेल्या काही काळात बंद झालेले सुमारे 125 बस मार्ग पुन्हा सुरू करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले गेले आहे. विशेषतः पूर्व उपनगरातील विक्रोळी, भांडुप आणि कांजूरमार्ग यांसारख्या भागांतील प्रवाशांना याचा मोठा फायदा होणार आहे. या भागांत अरुंद रस्ते आणि चढ-उतार असल्याने मोठ्या 12 मीटरच्या बस चालवण्यात अडचणी येत होत्या; मात्र आता 28 आसन क्षमता असलेल्या या लहान मिडी बसमुळे तिथली बस सेवा अधिक वेगवान आणि सुलभ होईल.

हे ही वाचा : 'भाजपच्या सापळ्यात अडकू नका, योग्य वेळी निर्णय घेऊ..' छठ पुजेवरुन राज ठाकरे आक्रमक

लास्ट माईल कनेक्टिव्हिटी

या बस ताफ्याच्या विस्तारामुळे मुंबईतील विविध निवासी संकुले, मेट्रो स्थानके आणि रेल्वे स्थानकांमधील 'लास्ट माईल कनेक्टिव्हिटी' अधिक मजबूत होणार आहे. प्रवाशांना त्यांच्या घरापासून ते रेल्वे किंवा मेट्रो स्थानकापर्यंत पोहोचण्यासाठी आता अधिक पर्याय उपलब्ध होतील. तसेच, वातानुकूलित सुविधेमुळे उन्हाळ्यात आणि गर्दीच्या वेळी मुंबईकरांचा प्रवास अधिक आरामदायी होण्यास मदत होणार आहे.

हे ही वाचा : नागपूर : कुख्यात गुन्हेगाराची भर चौकात निर्घृण हत्या, सिमेंटच्या कुंडीनं ठेचलं डोकं, मेहुण्यावर संशय

मुंबईकरांना दिलासा

या अतिरिक्त इलेक्ट्रिक बस टप्प्याटप्प्याने बेस्टच्या ताफ्यात दाखल केल्या जाणार आहेत. या नव्या करारामुळे आणि नियोजनामुळे बेस्ट उपक्रमाचा सध्याचा 400 बसचा असलेला ताफा वाढून सुमारे 525 पर्यंत पोहोचणार आहे. प्रदूषण कमी करणे आणि सार्वजनिक वाहतुकीचा दर्जा उंचावणे या दोन्ही दृष्टीने हा निर्णय मुंबईकरांसाठी अत्यंत दिलासादायक मानला जात आहे.