12 वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचे महिलेशी प्रेमसंबंध, तरुणाची केली हत्या अन्..

crime news : इयत्ता 12 वीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. कुटुंबियांनी तरुणाची हत्या करून मृतदेह रेल्वे ट्रॅकवर फेकून दिल्याचा आरोप आहे.

ADVERTISEMENT

crime news
crime news
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

रेल्वे रुळावर आढळला मृतदेह

point

विवाहित महिलेसोबत लैंगिक संबंधाचा संशय

Crime News : राजस्थानच्या अलवर येथे इयत्ता 12 वीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. मृत तरुणाची ओळख रविकांत शर्मा अशी ओळख समोर आली. कुटुंबियांनी तरुणाची हत्या करून मृतदेह रेल्वे ट्रॅकवर फेकून दिल्याचा आरोप आहे. रविकांत एक विवाहित महिलेसोबत प्रेमसंबंध सुरू होते, असा आरोप करण्यात येत आहे. याच मुद्द्याला धरून महिलांच्या नातेवाईकांनी त्याला सतत जीवे मारण्याची धमकी दिली होती. 

हे ही वाचा : नवऱ्यानं बायकोला संपवलं, मुलींना म्हणाला; 'आपण दुसरी आई आणू अन्..'

रेल्वे रुळावर आढळला मृतदेह

हा प्रकार राजस्थानातील राजगढ- बांदीकुई रेल्वे मार्गावर शेखा गार्डनमध्ये असलेल्या हनुमान मंदिराच्या मागे घडली होती. बुधवारी रात्री, रेल्वे रुळांवर एका व्यक्तीला ट्रेनची जोराची धडक लागल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. राजगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्यांना रविकांतचा मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर पोलिसांनी प्रकरणाचा पुढील तपास केला. 

एका वैद्यकीय मंडळाने शवविच्छेदन केले आणि मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला. मृत व्यक्तीचे वडील लोकेश शर्मा यांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी दोन्ही जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. एफएसएल पथकाने घटनास्थळाची पाहणी केली, तसेच पुरावे देखील गोळा करण्यात आले होते. 

संबंधित प्रकरणात तरुणाला काही दिवसांपासून फोनवरून जीवे मारण्याची धमकी देखील देण्यात आली. कुटुंबीय धमक्या देणाऱ्या आरोपींना भेटण्यास गेले होते. त्यांना रविकांतला सोबत आणण्यासाठी सांगितले होते. यानंतर कुटुंबीयांनी रविकांतचा शोध सुरू केला, मात्र तो कुठेच सापडला नव्हता. कुटुंबीयांनी त्याचा शोध ठेवला. दरम्यान, संध्याकाळी गावातील सरपंचाने फोन  केला असता, कुटुंबीयांना कळवले की, रविकांतचा मृतदेह हा राजगड-बांदीकुई रेल्वे मार्गावरील रूळांवर पडलेला होता.

विवाहित महिलेसोबत लैंगिक संबंध

कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, रविकांतचे एका विवाहित महिलेसोबत लैंगिक संबंध होते. महिलेच्या कुटुंबीयांना संबंधाबाबत कळाले असता, त्यांच्यात मोठा वाद निर्माण झाला. या प्रकरणात असा आरोप की, त्या महिलेचे कुटुंबीय अनेक दिवसांपासून विद्यार्थ्याला फोनवरून धमक्या देत होते. यामुळे त्याची हत्या झाली असावी, असा कुटुंबीयांनी संशय व्यक्त केला होता. 

हे ही वाचा : Astrology : आज 'या' राशीतील लोकांचा खर्च वाढेल, जाणून घ्या 12 राशींचे भविष्य

संबंधित प्रकरणात मयताचे वडील लोकेश शर्मा यांनी पोलिसांनी तक्रार दाखल केली असून दोन जणांविरुद्ध नावे नमूद करून गुन्हा दाखल केला. कुटुंबीयांचा आरोप असा की, त्या तरुणाची हत्या करुण हा अपघात वाटावा यासाठी त्या तरुणाला रेल्वे रुळावर फेकून देण्यात आले. मात्र, अद्यापही हत्येला दुजोरा दिलेला नाही. तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करून तपास केला.