100 प्रवासी असलेलं विमान एका क्षणात जळून खाक, हादरवून टाकणारा Video आला समोर!
Plane Crash: कझाकिस्तानमध्ये मोठा विमान अपघात झाला आहे. अझरबैजान एअरलाइन्सचे विमान जे 100 हून अधिक प्रवासी घेऊन जात होतं त्याचा अचानक भीषण अपघात झाला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

100 हून अधिक प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या विमानाच भीषण अपघात

कझाकिस्तानच्या अकातू विमानतळावर घडली दुर्घटना

विमान कोसळताच लागली प्रचंड मोठी आग
Plane crash video: अकातू (कझाकिस्तान): कझाकिस्तानमधील अकातू विमानतळाजवळ अझरबैजान एअरलाइन्सचे विमान कोसळले आहे. त्यात 105 प्रवासी आणि 5 क्रू मेंबर होते. रशियन वृत्तसंस्थांनी या अपघाताचा खुलासा केला आहे. त्यांनी सांगितले की, कझाकिस्तानच्या आपत्कालीन मंत्रालयाने सांगितले की, अझरबैजानी विमान बाकूहून ग्रोंजीला जात होते. अपघातापूर्वी विमानाने त्या विमानतळाभोवती बराच वेळ घिरट्या घातल्या. पण लँडिंग करताना विमान हे कोसळलं आणि क्षणार्धात आगीच्या विळख्यात सापडलं. (major accident in kazakhstan azerbaijan airlines plane crashes more than 100 passengers were on board)
दरम्यान, या दुर्दैवी घटनेचा व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या व्हिडीओमधून आपल्याला विमानाच्या अपघाताची तीव्रता लक्षात येईल.
हे ही वाचा>> Pune Dumper Accident : पुण्यातील वाघोलीमध्ये मध्यरात्री भीषण अपघात, फूटपाथवर झोपलेल्या 9 जणांना डंपरने चिरडलं
ग्रोंजी हे रशियाच्या चेचन्या भागत आहे. मात्र, धुक्यामुळे विमान हे ग्रोंजेच्या दिशेने वळवण्यात आले. टेंग्री न्यूज पोर्टलनेही अपघाताला दुजोरा दिला आहे. काही ट्विटर हँडलवर 105 प्रवासी असल्याचेही बोलले जात आहे. त्यापैकी बहुतेक अझरबैजानी आणि रशियन नागरिक होते. यातील सुमारे 10 प्रवासी या अपघातातून बचावले असल्याची माहितीही सोशल मीडियावर येत आहे.

अझरबैजान एअरलाइन्सने म्हटले आहे की, 'अपघातग्रस्त विमान एम्ब्रेर 190 विमान होते. त्याचा क्रमांक J2-8243 होता. बाकू ते ग्रोंजी मार्गावर त्याचे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. अकातूपासून तीन किलोमीटर अंतरावर इमर्जन्सी लँडिंगचा प्रयत्न करत असताना विमान कोसळले. अधिक माहिती वेळोवेळी दिली जाईल.'
हे ही वाचा>> Mumbai Agra Bus Fire : मुंबईहून आग्राकडे निघालेल्या बसला भीषण आग, ड्रायव्हरमुळे प्रवाशांचे...
रशियन न्यूज एजन्सी TASS ने दिलेल्या माहितीनुसार, हे विमान अझरबैजानमधील बाकू येथून रशियातील ग्रोन्जी येथे येत होते. चेचन्या विमानतळानुसार, धुक्यामुळे विमान मखाचाकलाच्या दिशेने वळवण्यात आले. पण त्याचवेळी अचानक विमानच क्रॅश लँडिंग झालं. दरम्यान, या दुर्घटनेनंतर तात्काळ 52 अग्निशमन दल आणि कझाकिस्तानच्या 11 अग्निशमन सेवा यांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्याला सुरुवात केली. अपघातस्थळी ऑपरेशनल हेडक्वार्टरही उभारण्यात आलं आहे.