Today Gold Rate : काय सांगता! सोनं झालं प्रचंड स्वस्त; तुमच्या शहरातील भाव वाचून खुश व्हाल
Today Gold Rate : इराण-इस्त्रायलचं युद्ध सुरु असतानाच मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरात उलथापालथ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. देशभरात सोन्याच्या किंमतीत या आठवड्यात किरकोळ घट झाल्याचं समोर आलं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
सोन्या-चांदीच्या दरात किती रुपयांनी झाली वाढ?
22 आणि 24 कॅरेट सोन्याचे आजचे दर काय?
मुंबईत आज 1 तोळा सोन्याचा भाव काय?
Today Gold Rate : इराण-इस्त्रायलचं युद्ध सुरु असतानाच मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरात उलथापालथ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. देशभरात सोन्याच्या किंमतीत या आठवड्यात किरकोळ घट झाल्याचं समोर आलं आहे. मागील एका आठवड्या दरम्यान 24 कॅरेट सोन्याच्या दरात थोडीफार घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, आज 22 जून 2025 रोजी 24 कॅरेट सोनं 930 रुपयांनी स्वस्त झालं आहे.
तर 22 कॅरेट गोल्डची किंमत 850 रुपयांनी कमी झाली आहे. देशातील सर्व शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत एक लाख रुपयांच्या पार गेली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 92 हजारांच्या पुढे गेले आहेत. राजधानी दिल्लीत आज 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 100900 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट गोल्डची किंमत 92500 रुपये झाली आहे. तसच आज चांदीचे प्रति किलोग्रॅमचे दर 110000 रुपयांवर पोहोचले आहेत. अशातच महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आजचे सोन्याचे दर काय आहेत? याबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती..
मुंबई
मुंबईत आज 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 100750 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याचे भाव 92350 रुपये झाले आहेत.
पुणे
पुण्यात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 100750 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याचे भाव 92350 रुपये झाले आहेत.









