काकी गेली पुतण्यासोबत पळून! काकाला समजताच झाला मोठा कांड, पोलीस स्टेशनमध्येच..
Shocking Love Story Viral : अलिगढमध्ये नात्याला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. काही दिवसांपूर्वी सासू जावयासोबत पळून गेली होती.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

12 वर्षांपूर्वी झालं होतं लग्न, पुतण्याने काकाला दिला धक्का

पुतण्या काकीसोबत गेला पळून..नंतर काय घडलं?

पोलिसांकडून फरार काकी-पुतण्याचा शोध सुरु
Shocking Love Story Viral : अलिगढमध्ये नात्याला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. काही दिवसांपूर्वी सासू जावयासोबत पळून गेली होती. आता हरदुआगंज पोलीस ठाणे हद्दीत काकी आणि पुतण्याच्या प्रेमप्रकरणामुळे खळबळ उडाली आहे. तीन मुलं असलेली महिला तिचा प्रियकर पुतण्यासोबत पळून गेली आहे. महिला तिच्या दोन मुलांनाही तिच्यासोबत घेऊन गेली आहे.
पतीने तक्रार दाखल केली, जीवाचा धोका..
पीडित पती जयरामने हरदुआगंज ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली आहे. त्याने आरोप केला आहे की, त्याने पुतण्याला मुलासारखं सांभाळलं. पण तो माझ्या मुलासोबत काही चुकीचं करेल याची भीती वाटते.
हे ही वाचा >> दुकानाजवळ लघवी केली म्हणून वाद, मटन कापण्याच्या सुऱ्याने भोसकून हत्या, संभाजीनगरमधील घटना काय?
12 वर्षांपूर्वी झालं होतं लग्न, घरात राहत होता पुतण्या
जयरामचं लग्न 12 वर्षांपूर्वी झालं होतं. त्याला तीन मुलं आहेत. पुतण्या त्यांच्या घरीच राहत होता. याचदरम्यान काकी आणि पुतण्यात प्रेमप्रकरण सुरु झालं. जेव्हा याबाबत माहित झालं, तेव्हा पुतण्याचं घरी येणंजाणं बंद करण्यात आलं. पीडित पतीने सांगितलं की, पुतण्याने याआधीही धमकी दिली होती की, तो त्याच्या पत्नीला आणि मुलाला त्याच्यासोबत घेऊन जाईल. आता आरोपीने त्याची पत्नी आणि मुलाला पळवून नेलं आहे.
हे ही वाचा >> सोबत फिरायला गेले आणि गाडीतच मित्राचा जीव घेतला... मुळशीतील हादरवून टाकणारी घटना काय?
पोलिसांकडून शोध सुरु
हरदुआगंज पोलीस ठाण्यातील एसओ धीरज कुमारने म्हटलंय की, पीडित व्यक्तीची तक्रार दाखल केली आहे. पीडिताने त्याच्या कुटुंबियांवर जीवघेणा हल्ला होण्याची शक्यता वर्तवली आहे. पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहेत. फरार महिला आणि तिच्या मुलांचा शोध सुरु आहे. पोलिसांचं म्हणणं आहे की, लवकरच महिला आणि तिच्या मुलांना सुरक्षित घरी आणलं जाईल.