कोकण, रायगड रत्नागिरीसह पुणे आणि साताऱ्यात पावसाचं थैमान, 'या' भागांना येलो अलर्ट

मुंबई तक

Maharashtra Weather Update : हवामान विभागाने 23 जून रोजी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. भारतीय हवामान खात्याच्या (IMD)नुसार मान्सून हा मे 2025 या महिन्याच्या अखेरीस सक्रिय झाला. विशेष करुन कोकणभाग, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मान्सून कायम राहण्याची शक्यता आहे.

ADVERTISEMENT

Maharashtra weather Update
Maharashtra weather Update
social share
google news

बातम्या हायलाइट

point

हवामान विभागाने 23 जून रोजी पावसाचा अंदाज वर्तवला

point

'या' भागांना येलो अलर्ट जारी केला

Maharashtra Weather Update : हवामान विभागाने 23 जून रोजी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. भारतीय हवामान खात्याच्या (IMD)नुसार मान्सून हा 2025 मे महिन्याच्या अखेरीस सक्रिय झाला. विशेष करुन कोकणभाग, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मान्सून कायम राहण्याची शक्यता आहे. दरम्यान 23 जूनच्या पावसाचे महत्त्वाचे अपडेट्स समोर आले आहेत, त्याबाबत आपण जाणून घेऊयात. 

हेही वाचा : 'जर कोणाला सांगितलं तर फोटो आणि व्हिडिओ व्हायरल...' महिला शिक्षिकेला तरुणांनी फ्लॅटवर नेलं अन्...

कोकण 

हवामान विभागाने कोकणात 23 जून रोजी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला आहे. काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. 

पश्चिम महाराष्ट्र

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूरात पाऊस मुसळधार असेल. पुणे आणि सातारा घाट परिसरात पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. तर शेतकऱ्यांना पेरणीबाबत सावधगिरी बाळगावी. या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. शेतकऱ्यांना पेरणीबाबत सावधगिरी बाळगावी असा हवामान विभागाने सल्ला दिला आहे. 

मध्य महाराष्ट्र

मध्य महाराष्ट्रातील नाशिक आणि अहमदनगरमध्ये तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात हवामान खात्याने पावसाच्या जोरदार सरी कोसळणार असून वादळी वारे वाहू लागतील असा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp