Manoj Jarange : सदावर्ते म्हणाले, ‘श्रद्धेय देवेंद्रजीं’; जरांगेंचा चढला पारा,”यांचे श्रद्धेय मराठा समाजाला…”

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

Maratha Reservation Update : manoj Jarange hits out at devendra fadnavis.
Maratha Reservation Update : manoj Jarange hits out at devendra fadnavis.
social share
google news

Maratha Reservation, Manoj Jarange vs Gunaratna Sadavarte : मनोज जरांगे पाटील आणि गुणरत्न सदावर्ते यांच्यात जोरदार शाब्दिक खडाजंगी सुरु झालीये. गुणरत्न सदावर्ते यांच्या गाड्या फोडण्यात आल्या. त्यानंतर संतापलेल्या सदावर्तेंनी जरांगे पाटलांना अटक करण्याची मागणी देवेंद्र फडणवीसांकडे. त्यावर मनोज जरांगे पाटलांनी श्रद्धेय असं म्हणत फडणवीसांवर गंभीर आरोप केला आहे. त्याचबरोबर आरक्षणाला विरोध असणाऱ्यांची यादीच माध्यमांना देणार असल्याचे मोठे विधान जरांगेंनी केले.

गुणरत्न सदावर्ते विरुद्ध मनोज जरांगे : फडणवीसांकडे बोट?

झालं असं की गुणरत्न सदावर्तेंच्या गाड्यांची तोडफोड करण्यात आली. त्यामुळे सदावर्ते संतापले. त्यांनी थेट जरांगे पाटलांना अटक करण्याची मागणी केली. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख ‘श्रद्धेय देवेंद्रजी’, असा केला. त्यानंतर यांचे कोण श्रद्धेय मराठा समाजाला आरक्षण मिळू देत नाही, हे सगळ्यांना माहिती आहे, असं मोठं विधान जरांगे पाटलांनी केले.

Exclusive: ‘कसं आरक्षण देत नाहीत तेच बघतो’, मनोज जरांगे पाटील यांचं थेट चॅलेंज

जरांगेला अटक करा… सदावर्तेंचं नेमकं विधान काय?

मुंबईत माध्यमांशी बोलताना सदावर्ते बोलले की,”जरांगे तुम्हाला मी सांगतो… मी श्रद्धेय देवेंद्रजींना मी सांगत आहे. अशा घटनांची श्रृखंला पोलिसांवरील हल्ल्यापासून सुरू झाली, ती आज माझ्या घरात येऊन ठेपली. गुन्हेगारी कायद्यातील कलम ७ अन्वये जरांगेला अटक करा. मुसक्या बांधा. कारवाई करा. अन्यथा सामान्यातील सामन्य जो गुणवंत आहे खुल्या वर्गातील… मग तो ब्राह्मण असेल, वाणी असेल… तो इतरातल्या इतर गुणवंतांमध्ये मनात असं येईल की, जात म्हणून एकत्र आलं, तर गुणवत्ता ही तोडमोड केली जाऊ शकते”, असं सदावर्ते म्हणाले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मनोज जरांगेंनी केलं गंभीर विधान

सदावर्तेंनी अटक करण्याची मागणी केली. त्याचबरोबर गाड्यांच्या तोडफोडीमागे जरांगे असल्याचा आरोप केला. या सगळ्या प्रकारावर बोलताना जरांगे पाटलांनी ‘श्रद्धेय’, हा शब्द वापरत अप्रत्यक्षपणे फडणवीसांना लक्ष्य केले.

समजून घ्या >> धनगर समाजाला ‘एसटी’ प्रवर्गातून आरक्षण का हवंय?

ते म्हणाले की, “याचं षडयंत्र मराठा समाज शांततेच्या आंदोलनानं उधळून लावणार. यांचे कोण श्रद्धेय मराठा समाजाला आरक्षण मिळू देत नाही, हे सगळ्यांना माहिती आहे. मराठा समाजाने श्रद्धेयांना खूप मोठं केलं. ते सध्या विमानानं फिरतात. त्यांची लेकरं ऐशोआरामात जगताहेत. आमची लोकं अजूनही लेकरांना शिकवून मोठं करण्याचे स्वप्न बघताहेत”, असंही जरांगे पाटील यावेळी म्हणाले.

ADVERTISEMENT

यावर ‘तुम्ही जे श्रद्धेय म्हणतात, हेच आरक्षण मिळू देत नाहीयेत का?’ या प्रश्नावर मनोज जरांगे पाटील म्हणाले, “असे लय मोठे आहेत. थोड्या दिवसांत यादी येणार आहे. आम्ही तुम्हाला देऊ.”

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT