Beed : मराठा आरक्षणासाठी आयुष्यच संपवलं! बीडमध्ये घरातच घेतला गळफास
jagannath kalkute suicide news : बीड शहरात एका व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली. मराठा आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केल्यानंतर त्यांनी शनिवारी रात्री घरात आत्महत्या केली.
ADVERTISEMENT
Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात ज्वलंत बनला आहे. आरक्षणासाठी आंदोलक आक्रमक झाले असून, बीडमध्ये ४४ वर्षीय आंदोलकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. जगन्नाथ पांडुरंग काळकुटे असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. आरक्षणासाठी आयुष्य संपवल्याची ही पाच दिवसांत दुसरी दुर्दैवी घटना आहे. (A 44 year old jagannath kalkute dies by suicide for maratha Reservation)
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणानंतर मराठा आरक्षणाच्या मागणीने जोर धरला आहे. गेल्या महिनाभरापासून हा मुद्दा चांगलाच ऐरणीवर आला आहे. मनोज जरांगे राज्यभरात दौरे करत असून, त्यांना पाठिंबा मिळू लागला आहे. दुसरीकडे काही दुर्दैवी घटनाही घडल्या आहेत. 19 ऑक्टोबर रोजी मुंबईत सुनील कावळे या आंदोलकाने आत्महत्या केल्यानंतर आता बीडमध्ये एका व्यक्तीने गळफास घेतला आहे.
मराठा आरक्षणासाठी गळफास घेऊन आत्महत्या
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी बीडमध्ये शनिवारी (21 ऑक्टोबर) रात्री जगन्नाथ पांडुरंग काळकुटे (वय 44) यांनी गळफास घेत आत्महत्या केली. बीड तालुक्यातील ससेवाडी येथील मुळ रहिवासी असलेले जगन्नाथ पांडुरंग काळकुटे हे रिक्षा चालक आहेत.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> ‘त्यांचं नाव तोंडातून काढू नका’, सुनील कावळेंच्या सुसाईड नोटमध्ये काय?
मुलांच्या शिक्षणाच्या निमित्ताने ते बीड शहरातील गोविंद नगर भागात वास्तव्यास होते. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी होत असलेल्या आंदोलनात ते कायम सहभागी होत होते. आंतरवाली सराटी येथे झालेल्या सभेतही ते सहभागी झाले होते.
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन
दरम्यान, शुक्रवारी रात्री ८ वाजता काळकुटे हे आरक्षणाच्या मागणीसाठी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील झाडावर चढले होते. आरक्षणासाठी झाडावरून उडी टाकून आत्महत्या करु असे त्यांनी म्हटले होते. मात्र,उपस्थित नागरिकांनी त्यांची समजूत काढून त्यांना झाडावरून खाली उतरवले होते.
ADVERTISEMENT
पत्नी गावी गेली अन् काळकुटेंनी संपवलं आयुष्य
शनिवारी काळकुटे यांच्या पत्नी अर्चना या गावी शेती कामासाठी गेल्या होत्या. मुले बाहेर होती. सायंकाळी 7 वाजता अर्चना काळकुटे या घरी आल्या असता जगन्नाथ काळकुटे यांनी घरात भगव्या गमजाने छताला गळफास घेतल्याचे आढळून आले. मृत काळकुटे यांच्या पश्चात आई, पत्नी अर्चना, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> गोष्ट एका सायनाईड जॉलीची! 14 वर्षात एकाच घरातील 6 हत्या, नेमकं प्रकरण होतं काय?
घटेनची माहिती मिळताच शिवाजीनगर ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अमोल गुरले व सहका-यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रूग्णालयात दाखल केला होता.
ADVERTISEMENT