Maratha Reservation : आरक्षणासाठी कराव्या लागतील ‘या’ गोष्टी, भोसले समिती अहवालात काय?
Maratha Reservation : मराठा आरक्षण टिकावे यासाठी सरकारने काय करायला हवे, याबद्दल निवृत्त न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखालील समितीने काही शिफारशी महाराष्ट्र सरकारला केल्या आहेत.
ADVERTISEMENT

Manoj Jarange Maratha Reservation : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चिघळला आहे. सरकारकडून सातत्याने मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देण्याचे आश्वासन दिलं जात आहे. पण, मराठा समाजाला टिकणार आरक्षण द्यायचं असेल, तर काय करावं लागेल, याबद्दल याआधीच एका समितीने काही शिफारशी केलेल्या आहेत.
उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली मविआ सरकार असताना सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केलं. त्यानंतर सरकारने निवृत्त मुख्य न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. या समितीने मराठा आरक्षणासाठी सरकारने काय करायला हवे, याबद्दल काही शिफारशी केल्या आहेत.
मराठा आरक्षण देण्यासाठी समितीने काय केलेल्या आहेत शिफारशी?
1) राज्य सरकारच्या वकिलांनी शक्य आहे ती सगळी बाजू सुप्रीम कोर्टाकडे मांडली आहे. पण, निवडक कागदपत्रांचा विचार हा सुप्रीम कोर्टाने निकाल देताना केला आहे.
2) राज्य सरकारने या निकालाबाबत तात्काळ पुर्नविचार याचिका दाखल करावी. मराठा आरक्षणाच्याबाबतीत अशा अनेक बाबी आहेत ज्याकडे लक्ष वेधलं गेलेलं नाही त्याकडे पुनर्विचार याचिकेतून सरकारने सुप्रीम कोर्टाचं लक्ष वेधावं.