Mazi Ladki Bahin Yojana : 'त्या' प्रकारावर शिंदे संतापले, अधिकाऱी, कर्मचाऱ्यांना गंभीर इशारा

मुंबई तक

Mazi Ladki Bahin Yojana News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीवरून अधिकारी कर्मचाऱ्यांना गंभीर इशारा दिला आहे. 

ADVERTISEMENT

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना

point

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अधिकाऱ्यांना गंभीर इशारा

point

महिलांकडून पैसे घेतले जात असल्याचे प्रकार उघडकीस

Mazi Ladki Bahin Yojana Latest Updates : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक प्रमाणपत्रे देणे आणि अर्ज भरुन घेण्यास इतर कामासाठी महिलांकडून पैसे घेतले जात असल्याचे व्हिडीओ समोर आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चांगलेच संतापले. या प्रकारानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना गंभीर इशारा दिला आहे. (CM Eknath Shinde Warns Government employees who taking money from women for Mazi Ladki Bahin Yojana Application)

"महिलांची अडवणूक केल्यास, प्रक्रियेत दिरंगाई केल्यास किंवा योजनेच्या लाभासाठी महिलांकडून पैशांची मागणी करीत असल्याचे निदर्सनास आल्यास अशा अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी", अशा सक्त सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

"ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे आणि जलदगतीने होईल यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष ठेवावे. या योजनेचे संनियंत्रण करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी, असे निर्देशही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत.

दलाल अजितबात खपवून घेणार नाही; मुख्यमंत्री शिंदेंचा इशारा

"माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील कागदपत्रे उपलब्ध करुन देणे किंवा फॉर्म भरुन देण्याचे निमित्त करुन निर्माण होणारे दलाल अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत. एखाद्या कार्यालयात असा प्रकार निदर्शनास आल्यास संबंधित कार्यालय प्रमुखावर तसेच दलालांवर कठोर कारवाई करण्यात येईल", असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

हे वाचलं का?

    follow whatsapp