Sanjay Gaikwad : ''व्हिडिओत मारहाण करणारा मीच'', शिंदेंच्या आमदाराची मुजोरी कायम
Buldhana Viral Video, Sanjay Gaikwad Reaction : व्हायरल व्हिडिओत मारहाण करणारा व्यक्ती मीच आहे, अशी कबुली संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी दिली आहे. तसेच भविष्यात कोणीही गोंधळ घातला तर माझी वृत्ती तशीच राहील,अशी भूमिका देखील गायकवाड यांनी मांडली आहे.
ADVERTISEMENT
Buldhana Viral Video, Sanjay Gaikwad Reaction : जका खान, बुलढाणा : शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी एका तरूणाला काठीने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या संबंधित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ही घटना समोर आली होती. असे असतानाच आता या मारहाणीच्या घटनेवर संजय गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. व्हायरल व्हिडिओत मारहाण करणारा व्यक्ती मीच आहे, अशी कबुली संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी दिली आहे. तसेच भविष्यात कोणीही गोंधळ घातला तर माझी वृत्ती तशीच राहील,अशी भूमिका देखील गायकवाड यांनी मांडली आहे. (mla sanjay gaikwad reaction on boy beating viral video buldhana shiv jayanti rally eknath shinde mla buldhana shocking story)
ADVERTISEMENT
बुलढाण्यात 19 फेब्रुवारीला आयोजित शिवजयंती मिरवणुकीत संजय गायकवाडांनी तरूणाला बेदम मारहाण केली होती. या सबंधित व्हिडिओ झाल्यानंतर संजय गायकवाडांच्या कृतीवर नागरिकांकडून संताप व्यक्त होतोय व कारवाईची मागणी होत आहे. अशात संजय गायकवाड यांनी माराहाणीच्या घटनेवर आपली भूमिका मांडली आहे.
हे ही वाचा : अजितदादा माझं गृह खातं मागतील, पण मी त्यांना.. : फडणवीस
मी एकाला मारहाण करतानाचा तो व्हिडिओ आहे, अशी कबुली देत संजय गायकवाड म्हणाले की, या घटनेची वस्तुस्थिती अशी आहे की, गेल्या अनेक महाराजांच्या जयंतीत एक गांजा पिणारी टोळी घुसते, ही टोळी महिला, मुलींवर चाकु हल्ला करते. या घटनेची पोलीसांच्या दफ्तरी नोंद असल्याचेही गायकवाड यावेळी नमूद करतात. त्यामुळे शिवजयंतीच्या मिरवणुकीतही अशी घटना घडण्याची शक्यता असल्याने आम्ही पोलिसांना आधीच याबाबतच्या खबरदारीच्या सुचना दिल्या होत्या,असे गायकवाड यांनी सांगितले.
हे वाचलं का?
पण तरीही मिरवणुकीच्या इतक्या मोठ्या गर्दीत पोलीस दल कमी पकडले होते. त्यात एका तरूणीने आणि तिच्या आईने माझ्याकडे त्या तरूणांची तक्रार देखील होती. त्यामुळे मी आणि माझा बॉर्डीगार्ड त्या तरूणांजवळ गेले असता, तरुणांनी माझ्या बॉर्डीगार्डला खाली पडले. इतक्यात तरूण हल्ला करण्यापुर्वी मी काठीने त्यांना चोप दिला,असे गायकवाड यांनी सांगितले.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Gautam Gambhir : गौतम गंभीर राजकारणातून 'आऊट'
''कुणी अशी प्रवृत्ती मिरवणुकीत येऊन जर आमच्या आई-बहिणीवर छेड काढण्याच्या प्रयत्नात असेल तर, 100 टक्के अशांना चाप देण्याची जबाबदारी मी आमच्या आयोजकांची आणि माझी होती. आणि ती मी पुर्ण केली, याचा मला जराही पश्चाताप नाही'', असे संजय गायकवाड यांनी म्हटले. तसेच ''माझ्या कोणत्याही कार्यक्रमात असे गैरकृत्य करणारे घुसले, तर मी पोलिसांची वाट पाहणार नाही. त्यामुळे मी जी भूमिका घेतली आहे, त्याचा मला अजिबात पश्चाताप नाही. ही माझी योग्य भूमिका होती'', असे संजय गायकवाड यांनी सांगितले.
ADVERTISEMENT
नेमकी घटना काय?
बुलढाण्यात गेल्या 19 फेब्रुवारीला शिवजयंतीनिमित्त आयोजित मिरवणुकीत ही घटना घडली आहे. या व्हिडिओत आमदार संजय गायकवाड यांनी तरूणाला बेदम मारहाण केली आहे. विशेष म्हणजे या मिरवणुकीत पोलीस देखील उपस्थित होते. मात्र पोलिसांनी ही मारहाण रोखण्याऐवजी आमदाराच्या मारहाणीच्या घटनेला समर्थन दिल्याचे व्हिडिओत दिसत आहे. कारण एका तरूणाला पोलिसांनीच धरले असताना आमदार संजय गायकवाड यांनी पोलीसाची काठीने त्याला बेदम मारहाण केला आहे. ही संपूर्ण घटना कॅमेरात कैद झाली आहे. दरम्यान पोलीस त्यांचे कर्तव्य निभावत असताना लोकप्रतिनिधीने कायदा हातात घेऊन अशाप्रकारची दादागिरी केल्याबद्दल नागरीकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT