Devendra Fadnavis: 'अजितदादा माझं खातं मागतील, पण मी त्यांना ते देणार नाही...', बारामतीत येऊन फडणवीस असं का म्हणाले?

रोहित गोळे

ADVERTISEMENT

गृहखातं अजित पवारांना देणार नाही, फडणवीस असं का म्हणाले?
गृहखातं अजित पवारांना देणार नाही, फडणवीस असं का म्हणाले?
social share
google news

Devendra Fadnavis on Ajit Pawar Home Ministry: बारामती: 'दादा मला हळूच म्हणतील की, पीएमसी का? गृह खातंच मला द्या.. मी पण ते मी देणार नाही..' असं विधान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीच्या कार्यक्रमात केलं आहे. खरं तर फडणवीसांनी हे विधान अजित पवार यांचं कौतुक करताना केलं आहे. बारामतीमध्ये शासनाच्या वतीने महारोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीमधील नव्याने बांधण्यात आलेल्या शासकीय इमारती आणि बस स्टँडबाबत बोलताना अजित पवार यांचं तोंडभरून कौतुक केलं. (ajit dada will ask for my home ministry but I will not give it to him why did devendra fadnavis say this when he came to baramati)

देवेंद्र फडणवीसांकडून अजितदादांचं कौतुक, पण गृहखातं मात्र...

बारामती बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 'महारोजगार हा पहिला मेळावा आपण नागपूरला घेतला. त्यावेळी 11 हजार जणांना रोजगार मिळाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय केला की, एक चांगला मेळावा अशा प्रकारचा घेतला तर त्यातून तरुणाईला काम देता येतं. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर असे मेळावे करावे असा निर्णय झाला. त्यातील पश्चिम महाराष्ट्रातील मेळावा हा बारामतीत होत आहे.' 

'या मेळाव्याकरिता अजित पवार यांनी भरपूर मेहनत केली आहे. त्यामुळे आज मला विश्वास आहे की, पहिल्यांदा असं होतंय की, अधिसूचित केलेली पदं जास्त आहेत पण अर्ज कमी आहेत. 36 हजार अर्ज आहेत आणि 55 हजार पदं आहेत. रोजगार देण्याचं काम निश्चितपणे मोठ्या प्रमाणात करणार आहोत. त्याची सुरुवात आता झाली आहे.'

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> Gautam Gambhir : गौतम गंभीर राजकारणातून 'आऊट'

'आज या महारोजगार मेळाव्यासोबत अनेक चांगल्या इमारतींचं उद्घाटन केलं. विशेषत: जो बारामतीचा बस स्टँड आहे तो एखाद्या एअरपोर्टसारखा वाटावा अशा प्रकारचा बस स्टँड बारामतीला मिळाला आहे.' 

'या ठिकाणी बारामतीत पोलीस स्टेशन असेल, पोलीस उपमुख्यालय असेल.. किंवा पोलिसांकरिता क्वॉर्टस असतील हे सरकारी बांधकाम आहे असं वाटतच नाही. एखाद्या कॉर्पोरेट कंपनीचं ऑफिस असावं अशा प्रकारचं पोलीस उपमुख्यालय दादा तुम्ही बारामतीकरांना दिलंय.'

ADVERTISEMENT

'आता दोन गोष्टी यातून होतील की, माझ्या मागे.. की आम्हाला बारामतीलाच पोस्टिंग द्या. कारण एवढं चांगलं कार्यालय आणि निवासस्थान हे बारामतीलाच उपलब्ध आहे.' 

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> 'सत्तातुरांना ना भय ना लज्जा!', 'सामना'तून सरकारचे वाभाडे

'निश्चितपणे यानिमित्ताने मी तुम्हाला एक विनंती करू इच्छितो की, तुम्ही स्वत: लक्ष घालून इतक्या चांगल्या इमारती बांधल्या.. मला तर आता मोह होतोय की, आपल्या पोलीस विभागाच्या जेवढ्या इमारती आहेत त्याचं PMC म्हणून तुम्हालाच नियुक्त करून टाकावं म्हणजे सगळ्या इमारती चांगल्या होतील.' 

 

'अर्थात दादा मला हळूच म्हणतील की, पीएमसी का? खातंच मला द्या.. मी चांगल्या इमारती बांधतो.. पण ते मी देणार नाही.. ते माझ्याकडेच ठेवीन. पण तुमची मदत मात्र सगळ्या चांगल्या इमारती बांधण्याकरिता निश्चितपणे घेईन.' 

'अतिशय सुंदर इमारती या ठिकाणी झाल्या. मला असं वाटतं की, बारामतीच्या वैभवात भर घालणाऱ्या इमारती आहेत. मला वाटतं की, सरकारी ऑफिसेस चांगले का असू नयेत? ते चांगलेच असावेत.. कारण ज्या ठिकाणी जनता जाते.. ती कार्यालये चांगलीच असली पाहिजेत आणि अधिकाऱ्यांमध्येही लोकाभिमुखता असली पाहिजे.' असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. 
 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT