Monkeypox चा कहर वाढला, मुंबई महापालिकेने पावलं उचलत केली ‘ही’ तयारी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कोरोना विषाणूचा कहर जगभराने पाहिला आहे. अशात आता मंकीपॉक्स हा नवा आजार डोकं वर काढू लागला आहे. भारतात या आजाराचा रूग्ण अद्याप आढळलेला नाही. तरीही मुंबई महापालिकेने आणि राज्य सरकारने खबरदारीची पावलं टाकण्यास सुरूवात केली आहे. मुंबई महापालिकेने सगळ्या रूग्णालयांना सतर्क केलं आहे.

ADVERTISEMENT

मंकीपॉक्स या आजाराबद्दल काही प्रमुख मुद्दे

मंकीपॉक्स हा विषाणूजन्य झुनोटिक रोग आहे जो प्रामुख्याने मध्य आणि पश्चिम आफ्रिकेतील उष्णकटिबंधीय रेनफॉरेस्ट भागात आढळतो आणि इतर प्रदेशांमध्ये प्रसारित होत आहे.

हे वाचलं का?

मंकीपॉक्सचे चिकिस्तिय सादरीकरण (clinical presentation) देवि रोगा सारखे आहे, देवी रोग हा ऑर्थोपॉक्सवायरल संसर्ग असुन 1980 मध्ये या रोगाचे संपूर्ण जगभरात निर्मूलन झाले असे घोषित केले होते. मंकीपॉक्स देवि रोगा पेक्षा कमी संसर्गजन्य आहे आणि कमी गंभीर आहे.

ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, कॅनडा, जर्मनी, फ्रान्स, इटली, पोर्तुगाल, स्पेन, स्वीडन, यू.के., यू.एस.ए. या देशांमध्ये मंकीपॉक्स हा आजार सहसा आढळत नाही, तरी सद्यस्थितीत वरील देशांमध्ये या आजाराचा उद्रेक होत आहे.

ADVERTISEMENT

तसेच मध्य आणि पश्चिम आफ्रिकेतील देशांत हा आजार सहसा आढळून येतो. जसे कि बेनिन, कॅमेरून, मध्य आफ्रिका, काँगो, गॅबॉन, घाना (केवळ प्राण्यांमध्ये ओळखले जाते), आयव्हरी कोस्ट, लायबेरिया, नायजेरिया, काँगोचे प्रजासत्ताक, सिएरा लिओन आणि दक्षिण सुदान या देशांमध्ये मंकीपॉक्स हा आजार आढळतो.

ADVERTISEMENT

या आजरा बद्दलची माहिती मुंबईतील सर्व खाजगी आणि शासकीय आरोग्य संस्था यांना देण्यात आली आहे.

वर्तमान परिस्थिती – आजपर्यंत (23 मे 2022) भारतात मंकी पॉक्सचा कोणताही संशयित किंवा पुष्टी झालेला रुग्ण आढळलेला नाही.

मंकीपॉक्सचा प्रादुर्भाव :

मंकीपॉक्सचा प्रादुर्भाव प्राण्यांपासून मनुष्यास तसेच मनुष्यापासून मनुष्यास होऊ शकतो. हा विषाणू लहान जखमा, श्वसनमार्गातून किंवा डोळे, नाक, तोंडाद्वारे शरीरात प्रवेश करतो.

जनावरांच्या ओरखडे किंवा चाव्याव्दारे, तसेच वन्य जनावरांचे मांस खाणे या मध्यामांमधून या विषाणूचा प्रसार प्राण्यांपासून मनुष्यापर्यंत होऊ शकतो, शरीरातील द्रव किंवा घाव सामग्रीचा प्रत्यक्ष व अप्रत्याक्षपणे संपर्क किंवा दूषित बिछान्याद्वारे या आजाराचे मानवास संक्रमण होऊ शकते.

मानव-ते-मानवी संक्रमण प्रामुख्याने श्वसनाच्या मोठ्या थेंबांद्वारे (respiratory droplets) होते, तसेच ज्यांना सामान्यत: दीर्घकाळ जवळच्या संपर्काची आवश्यकता असते.

हे शरीरातील द्रव किंवा घाव सामग्रीच्या थेट संपर्काद्वारे आणि घाव सामग्रीच्या अप्रत्यक्ष संपर्काद्वारे देखील प्रसारित केले जाऊ शकते, जसे की संक्रमित व्यक्तीचे संसर्गित कपडे .

मंकीपॉक्स या विषाणूचा शरीतात प्रवेश झाल्यापासून ते प्रत्यक्ष लक्षणे दिसण्याचा कालावधी

साधारणतः 7-14 दिवसांचा असतो परंतु 5-21 दिवसांपर्यंत असू शकतो आणि या कालावधीत व्यक्ती सहसा संसर्गजन्य नसते.

पुरळ दिसण्याच्या 1-2 दिवस आधी संक्रमित व्यक्ती हा रोग प्रसारित करू शकतो आणि सर्व खपली जाईपर्यंत संसर्ग राहू शकतो.

मंकीपॉक्स आजाराची लक्षणे :

मंकीपॉक्सची सामान्यत: लक्षणे ताप येणे, पुरळ आणि मोठ्या प्रमाणात गाठी (lymph node) येणे हि आहेत आणि त्यामुळे वैद्यकीय गुंतागुंत होऊ शकतात.

पुरळ पोट किंव्हा पाठी ऐवजी चेहऱ्यावर आणि हातपायांवर जास्त केंद्रित असते. पुरळ मोठयाप्रमाणात चेहरा ( ९५% ), हाताचे तळवे आणि पायांचे तळवे (७५%), तोंडातील व्रण (७०%) , जननेंद्रिय (३०%) आणि डोळे (२०%) दिसते.

मंकीपॉक्स हा सामान्यतः स्वयं-मर्यादित आजार आहे. ज्याची लक्षणे 2 ते 4 आठवड्यांपर्यंत असतात. रुग्णाची परिस्थिती गंभीर होऊ शकते. मृत्यू दर 1-10% पर्यंत असू शकतो.

लहान मुलांमध्ये या आजारचे जास्त तीव्र स्वरूप आढळून येते

मंकीपॉक्सच्या संशयित रुग्णांचे विलगीकरण आणि औषधोपचार

संशयित रुग्ण: उपरोक्त आफ्रिकेतील देशांमधून मागील २१ दिवसांत प्रवास केलेल्या व्यक्तीमध्ये सदर आजाराची वर उल्लेख केलेली लक्षणे आढळली तर त्या व्यक्तीस पुढील निदान व उपचारा करिता नजीकच्या दवाखाण्यात संदर्भित करावे.

विमानतळ अधिकारी मंकीपॉक्सचा आढळणाऱ्या व नआढळणाऱ्या (non-endemic) देशांतून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करत आहेत.

कस्तुरबा रुग्णालयात संशयित रुग्णांच्या विलगीकरणासाठी स्वतंत्र वॉर्ड क्रमांक 30 (28 खाटा) तयार करण्यात आला असून, त्यांचे चाचणीनमुने तपासणी साठी NIV पुणे प्रयोगशाळेत पाठवले जातील.

उपचार:

लक्षणांच्या तीव्रतेवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि ती कमी करण्यासाठी योग्य तो औषधोपचार देण्यात यावा. तसेच दुय्यम बॅक्टरील संसर्ग असल्यास त्यावर योग्य ते उपचार करण्यात यावेत.

पुरेशा प्रमाणात द्रव्ये द्यावीत, जेणेकरून शरीरात पाण्याची कमतरता येणार नाही. पोषक आहार देण्यात यावा.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT