मुंबईची खबर : CSMT स्थानकात 75 दिवसांचा ट्राफिक अन् पॉवर ब्लॉक, वेळापत्रक कोलमडणार; मध्य रेल्वेचा निर्णय काय?

मुंबई तक

मध्य रेल्वेने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सीएसएमटी स्थानकावर 1 ऑक्टोबर पासून 75 दिवसांचा ट्राफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. या काळात वेळापत्रक नेमकं कसं असणार आहे, जाणून घ्या.

ADVERTISEMENT

CSMT Traffic and Power Block
CSMT Traffic and Power Block
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

CSMT स्थानकात 75 दिवसांचा ट्राफिक अन् पॉवर ब्लॉक

point

काय आहे मध्य रेल्वेचा निर्णय?

CSMT Traffic and Power Block : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पुनर्विकास कामाच्या पहिल्या टप्प्यासाठी मध्य रेल्वेने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. दिनांक 1 ऑक्टोबर 2026 ते 15 डिसेंबर 2026 या 75 दिवसांच्या कालावधीत ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 14, 15 आणि स्टेब्लिंग लाईन 15 हा ब्लॉक घेण्यात येईल. यापूर्वी प्लॅटफॉर्म 16 आणि 17 वर घेण्यात आलेल्या ब्लॉकची ही पुढील मुदतवाढ असून, या कालावधीत पायाभरणी व इतर आधुनिकीकरणाची कामे पूर्ण केली जातील.

रेल्वे सेवेवर काय परिणाम होणार?

या 75 दिवसांच्या ब्लॉकमुळे 'अप' (Up) दिशेने येणाऱ्या अनेक महत्त्वाच्या मेल आणि एक्सप्रेस गाड्यांची सेवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसऐवजी दादर किंवा ठाणे स्टेशनवरच 'शॉर्ट टर्मिनेट' (Short Terminated) करण्यात येणार आहे. म्हणजेच या गाड्या आपल्या अंतिम टप्प्यापूर्वीच दादर किंवा ठाणे येथेच थांबतील. प्लॅटफॉर्म 14 आणि 15 वरील काम पूर्ण होऊन ते पुन्हा रेल्वेच्या प्रवाशांसाठी खुले होईपर्यंत ही तात्पुरती व्यवस्था कायम राहील.

हे ही वाचा : जळगाव : मैत्रिणीने गोड बोलून स्वच्छतागृहात नेलं अन् दोघांकडून सामुहिक बलात्कार

दादर स्टेशनपर्यंतच धावतील 'या' गाड्या

दादर स्टेशनवर शॉर्ट टर्मिनेट होणाऱ्या प्रमुख गाड्यांमध्ये बल्लारशाह-CSMT नंदीग्राम एक्सप्रेस (11002), हावडा-CSMT एक्सप्रेस (12810), अमरावती-CSMT एक्सप्रेस (12112), भुवनेश्वर-CSMT कोणार्क एक्सप्रेस (11020), मडगाव-CSMT तेजस एक्सप्रेस (22120), बिदर-CSMT एक्सप्रेस (22144) आणि लातूर-CSMT एक्सप्रेस (22108) यांचा समावेश आहे. या गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसऐवजी दादरपर्यंतच धावतील.

हे ही वाचा : Antilia Bomb Case: मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील आरोपी सचिन वाझे तुरुंगातून येणार बाहेर, कोर्टाकडून मोठा दिलासा

रेल्वेने काय सांगितले?

याशिवाय, मंगळुरू-CSMT एक्सप्रेस (12134) ही गाडी ठाणे (Thane) स्टेशनवरच शॉर्ट टर्मिनेट करण्यात येणार आहे. सीएसएमटी स्थानकाच्या पायाभूत सुविधांचा विकास आणि आधुनिकीकरणासाठी हे 'ब्लॉक्स' अत्यंत आवश्यक असून, यामुळे प्रवाशांची होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे. प्रवाशांनी सुधारित वेळापत्रक तपासूनच आपल्या प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन मध्य रेल्वेकडून करण्यात आले आहे.