Konkan: गणपती विसर्जन केलं अन् मुंबईला एकटाच निघाला, रस्त्याच काळाने घातली झडप

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbai goa highway accident unfortunate death of a youth from mumbai who was returning to konkan after ganpati immersion
mumbai goa highway accident unfortunate death of a youth from mumbai who was returning to konkan after ganpati immersion
social share
google news

Mumbai-Goa Highway Accident Death: गोकूळ कांबळे, नागोठणे, (रायगड): मुंबई-गोवा महामार्गावर (Mumbai-Goa Highway) अपघातांचं सत्र संपायचं नाव घेत नाही. रायगड (Raigad) जिल्ह्यात नागोठणे येथे झालेल्या भीषण अपघातात मुंबईतील (Mumbai) एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू (Accident Death) झाला आहे. महामार्गावर भरधाव वेगाने आलेल्या ट्रेलर चालकाने दारूच्या नशेत समोरच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की या अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाला. (mumbai goa highway accident unfortunate death of a youth from mumbai who was returning to konkan after ganpati immersion)

ADVERTISEMENT

मिळालेल्या माहितीनुसार, दुचाकीवरील संदेश सदानंद घाणेकर (वय 32 वर्ष) या तरुणाचा मृत्यू झाला. हा तरुण मूळचा रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील आहे. गणेशोत्सवकरून तो पुन्हा मुंबईकडे दुचाकीवरून चालला होता. मुंबई-वडाळा गणेश नगर येथे तो राहत होता.

नेमकं काय घडलं?

संदेश हा नोकरीनिमित्त मुंबईत वास्तव्यास होता. कानसई गावच्या हद्दीत हॉटेल नवरत्नजवळ हा भीषण अपघात झाला. ट्रेलर चालक दारूच्या नशेत सुकेळीकडून नागोठणेकडे भरधाव वेगात निघाला होता. ज्यामुळे झालेल्या अपघातात संदेशला आपला हकनाक जीव गमवावा लागला.

हे वाचलं का?

याप्रकरणी मध्य प्रदेशातील ओमप्रकाश रामलाल पटेल (वय 36) या ट्रेलर चालकावरती गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. या अपघाताचे वृत्त कळताच नागोठणे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री पोमण व पोलीस कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

हे ही वाचा >> Mumbai Video: बापरे! ठाण्यात किचनच्या खिडकीतून घरात शिरला महाकाय साप

संदेश सदानंद घाणेकर याचं दोन वर्षांपूर्वीच लग्न झालं होतं. तो नोकरीनिमित्त मुंबईतील वडाळ्यात राहत होता. आई-वडील पत्नी या सगळ्यांना तो गावी ठेवून दुचाकीवरून मुंबईकडे निघाला होता. पण दुर्दैवाने संदेशचा प्रवास अखेरचा ठरला.

ADVERTISEMENT

संदेश याच्या अपघाताचे वृत्त समजताच वडाळ्यातील गणेश नगर परिसरातील मित्रांना धक्का बसला. संदेश हा वडाळा येथील यश गोविंद पथकात देखील सहभागी होत असे. आपली नोकरी सांभाळून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होता. संदेश घाणेकर त्याच्या अपघाती मृत्यूने सावर्डे परिसरातही हळहळ व्यक्त केली जात आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Pune Traffic: पुणेकरांनो… अनंत चतुर्दशीला ‘हे’ रस्ते बंद, घराबाहेर पडण्याआधी ही बातमी वाचा!

वाकण रोहा येथील पोलीस हवालदार निलेश गव्हाणकर यांनी या अपघाताची फिर्याद पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. नागोठणे पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली आहे. नागोठणे पोलीस ठाण्याचे जी. एम. भोईर अधिक तपास करत आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT