Mumbai Rain : ठाकरे-शिंदेंना पाऊस देणार गुलीगत धोका, दसरा मेळाव्यावर पावसाचं सावट!

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbai rain update udhhav thackeray vs eknath shinde dasara melava heavy rain chances in mumbai maharashtra rain 2024
दसरा मेळाव्यावर पावसाचं सावट
social share
google news

बातम्या हायलाइट

point

ठाकरे-शिंदेंच्या दसरा मेळाव्याची जोरदार तयारी

point

दसरा मेळाव्यात पाऊस खोडा घालणार

point

मुंबईत हवामान विभागाचा अंदाज काय?

Uddhav Thackeray vs Eknath Shindi Dasara Melava mumbai Rains : मुंबईत आज शिवसेना युबीटी प्रमुख उद्धव ठाकरे यांचा शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळावा पार पडणार आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आझाद मैदानावर दसरा मेळावा पार पडणार आहे. या दसरा मेळाव्याची पहाटे पासून जय्यत तयारी सूरू आहे. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून ठाकरे-शिंदे यांचा दसरा मेळावा पाहण्यासाठी नागरीक आले आहेत. या मेळाव्याला थोड्याच वेळात सूरूवात होणार आहे. पण या दसरा मेळाव्यावर पावसाच सावट असणार आहे. त्यामुळे दसरा मेळाव्या दरम्यान मुंबईत हवामानाचा अंदाज काय आहे? जाणून घेऊयात. (mumbai rain update udhhav thackeray vs eknath shinde dasara melava heavt rain chances in mumbai maharashtra rain 2024)

ADVERTISEMENT

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आजही राज्याच्या विविध भागात पावसाची शक्यता आहे. मुंबईत देखील आज जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मध्य मुंबईत ढगाळ वातावरण आहे. त्यात आज उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडणार आहे. मात्र या दोन्ही दसरा मेळाव्यावर पावसाचे सावट आहे. 

हे ही वाचा : Pankaja Munde : ''मी कुणालाही घाबरत नाही, आपला डाव खेळणार...'', पंकजा मुंडेंच्या निशाण्यावर जरांगे?

मुंबईला यलो अलर्ट 

मुंबईत आज काही ठिकाणी ढगांच्या कडकडाटांसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज वाऱ्याचा वेग हा 30-40 किमी प्रती तास असण्याचाही अंदाज आहे. तसेच मुंबईला आज यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे दसरा मेळाव्यात मुसळधार पाऊस पडण्याचा शक्यता आहे. 

हे वाचलं का?

या' जिल्ह्यांनाही मुसळधार पावसाचा इशारा 

परतीचा पाऊस उत्तर भारतातून वेगाने पुढे महाराष्ट्रात आला आहे.  अरबी समुद्रावर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे राज्यात ढगाळ वातावरण आणि उकाडा असे वातावरण तयार झाले आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना पुढचे तीन दिवस यलो अलर्ट जारी करण्यात आले आहे. 

त्याचबरोबर पुढील 5 दिवस म्हणजेच 16 ऑक्टोबरपर्यंत मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर अशा 18 जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील काही दिवस पुन्हा राज्यात पावसाची शक्यता असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Manoj Jarange : ''समाजाला न्याय मिळाला नाहीतर उलथापालथ...'', नारायणगडावरून जरांगेंचा महायुती सरकारला इशारा

राज्यामध्ये एकीकडे परतीच्या पावसाच्या सरी कोसळत आहेत, तर दुसरीकडे 'ऑक्टोबर हीट'चा तडाखा सोसावा लागत आहे. हवामान विभागाने 16 ऑक्टोबरपर्यंत पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT