Video : धक्कादायक! 3 सेकंदात होत्याचं नव्हतं झालं, महामार्गावर दगड पडून गाड्यांचा चकनाचूर
नागालॅंडमधील (Nagaland) एका महामार्गावर दरड कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत महामार्गावरून धावणाऱ्या गाड्यांचा अक्षरश चकनाचुर झाला होता. अवघ्या तीन सेकंदात ही घटना घडली. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.
ADVERTISEMENT
पावसामुळे डोंगराळ भागात किंवा महामार्गावर भुस्खलन (landslide) अथवा दरड कोसळण्याच्या अनेक घटना घडत असतात. अशीच एक घटना आता नागालॅंडमधून समोर आली आहे. या घटनेत नागालॅंडमधील (Nagaland) एका महामार्गावर दरड कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत महामार्गावरून धावणाऱ्या गाड्यांचा अक्षरश चकनाचुर झाला होता. अवघ्या तीन सेकंदात ही घटना घडली. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. नेशनल हायवे 29 वर ही घटना घडली आहे. या घटनेने संपूर्ण राज्य हादरलं आहे. (nagaland landslide video kahima dimapur national highway gaint rocks sliding hills)
ADVERTISEMENT
नेशनल हायवे (National Highway) 29 वरून भुस्खलना दरम्यान दरड कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत हायवेवरून धावणाऱ्या गाड्यांवर दरड कोसळली होती. ही दगडे इतकी महाकाय होती की गाड्यांचा अक्षरश चुराडा होत होता. या घटनेत एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला होता, तर एकाने रूग्णालयात उपचारा दरम्यान दम तोडला होता. यासोबत एका गाडीवर पडलेल्या दगडामुळे ती संपूर्ण चेपली होती आणि एक व्यक्ती त्यात अडकून पडला होता. ही संपूर्ण घटना हायवेवरून प्रवास करणाऱ्या एका गाडीत कैद झाली होती.
व्हिडिओत तुम्ही पाहू शकता, काही गाड्या या हायवेवर उभ्या आहेत. या दरम्यानच हायवेवर दरड कोसळायला सुरुवात होते. यामध्ये एक दगड इतका महाकाय असतो की गाडीचा अक्षरश चकनाचुर होतो. तर दुसऱ्या एका गाडीची दगडाला टक्कर बसून ती पलटी होते. अवघ्या तीन सेकंदात या घटनेत होत्याचं नव्हतं झाले आहे.
हे वाचलं का?
नागालैंड में भूस्खलन का दिल दहला देने वाला वीडियो.#nagaland #landslide #usergeneratedcontent pic.twitter.com/AaB8a6qUAL
— AajTak (@aajtak) July 4, 2023
मिळालेल्या माहितीनूसार, दीमापुर-कोहिमा नेशनल हायवेर संध्याकाळी 5 वाजता दरड कोसळली. ज्या ठिकाणी भुस्खलन झाले त्याला पाकला पहार म्हटले जाते. येथे नेहमीच भुस्खलन आणि दगड कोसळण्याच्या घटना घडत असतात. सध्या देशभरातील अनेक भागात पाऊस पडत आहे. त्यामुळे उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश यांसारख्या ठिकाणी भुस्खलनाच्या घटना घडतात. केदारनाथ यात्रा देखील अनेकदा भुस्खलनामुळे थांबवावी लागते.
ADVERTISEMENT
दरम्यान या घटनेवर नागालँडचे मुख्यमंत्री नेफियू रियो यांनी मृत पावलेल्या नागरीकांच्या कुटुंबियांना 4-4 लाखाची आर्थिक मदत जाहीर केली आहे. यासोबत जखमींनाही सर्वोत्तपरी मदत करण्याचे आश्वासनही दिले आहे. या प्रकरणात राज्य सरकार सर्व आवश्यक पावले उचलेल असे देखील त्यांनी म्हटले आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT