नागपूर : बेपत्ता नवऱ्याला शोधण्याचे बहाण्याने महिलेवर अत्याचार, अमरावतीचा भोंदू बाबा ताहीर रशीद बेग अटकेत

मुंबई तक

नागपूरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भोंदू बाबा ताहीर रशीद बेग याने तंत्र आणि मंत्राच्या बहाण्याने एका महिलेवर अत्याचार केले आहेत. नेमकं प्रकरण काय आहे, जाणून घेऊया.

ADVERTISEMENT

Nagpur Crime
Nagpur Crime
google news

बातम्या हायलाइट

point

नागपूर : बेपत्ता नवऱ्याला शोधण्याचे बहाण्याने महिलेवर अत्याचार

point

अमरावतीचा भोंदू बाबा ताहीर रशीद बेग अटकेत

Nagpur Crime, योगेश पांडे : नागपूर शहरात माणुसकीला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तंत्र-मंत्राच्या नावाखाली एका भोंदू बाबाने महिलेचे शारीरिक शोषण केल्याचे उघड झाले आहे. पीडित 36 वर्षीय महिला लोकांच्या घरी घरकाम करून आपला उदरनिर्वाह करते. 15 ऑक्टोबर 2025 रोजी या महिलेचा पती कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेला होता. आपल्या बेपत्ता पतीच्या चिंतेत असलेल्या महिलेचा फायदा घेत, तिला पती शोधून देण्याचे खोटे आश्वासन देऊन या भोंदू बाबाने तिच्यावर अत्याचार केला.

मदतीच्या बहाण्याने केले शारीरिक शोषण

या प्रकरणी सक्करदरा पोलिसांनी तातडीने कारवाई करत अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव बारी, डब्बीपुरा येथील रहिवासी असलेल्या ताहीर राशिद बेग या आरोपीला अटक केली आहे. पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपीने तिच्या हतबलतेचा गैरफायदा घेत तिला आपल्या जाळ्यात ओढले आणि मदतीच्या बहाण्याने तिच्यावर वारंवार बलात्कार केला. हा प्रकार समोर आल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून, पोलिसांनी आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत.

हे ही वाचा : बिझनेसमनच्या मुलाने बेदरकारपणे कार चालवली, फाईव्ह स्टार हॉटेलमधील महिला कर्मचाऱ्याचा जीव गेला

सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून भोंदू बाबा आणि स्वयंघोषित तांत्रिकांकडून महिलांचे शोषण होण्याच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. नुकतेच नाशिकमध्ये कॅप्टन अशोक खरात याच्या महिलांवरील अत्याचाराचे व्हिडिओ समोर आल्याने संपूर्ण राज्य हादरले होते. ती घटना ताजी असतानाच आता नागपुरातून अशाच प्रकारचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. अंधश्रद्धेचा आधार घेऊन असहाय्य महिलांना लक्ष्य करणाऱ्या या प्रवृत्तींमुळे समाजातील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

हे ही वाचा : एप्रिलमध्ये तयार होतोय त्रिग्रही महायोग, सूर्य, मंगळ आणि शनीती युती; 'या' राशींचे भाग्य उजळणार

पोलिसांचे नागरिकांना आवाहन

सध्या सक्करदरा पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, अटक करण्यात आलेल्या ताहीर राशिद बेग याने आतापर्यंत आणखी किती महिलांना अशाच प्रकारे आपल्या जाळ्यात ओढून त्यांचे आर्थिक किंवा शारीरिक शोषण केले आहे, याचा शोध घेतला जात आहे. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अशा कोणत्याही भोंदूगिरीला बळी पडू नये आणि संकटसमयी तांत्रिकांकडे जाण्याऐवजी कायदेशीर मार्गाचा किंवा पोलिसांचा आधार घ्यावा. आरोपीला कडक शासन व्हावे, अशी मागणी आता सर्वस्तरातून होत आहे.
 

हे वाचलं का?